धुळे : ब्रिटीश काळापासुन धुळे-चाळीसगाव या शहरांना जोडणारी रेल्वे गाडी आधी वाफेच्या आणि नंतर डिझेलच्या इंजिनानंतर तब्बल ११० वर्षानंतर पहिल्यांदा बुधवारी सकाळी विजेवर धावली़११० वर्षानंतर कायापालटखान्देशाची राणी म्हणून ओळख असलेली वेगाने प्रवाशांना सेवा देणारी रेल्वे धुळे-चाळीसगाव पॅसेंजर गाडी १५ आॅक्टोबर १९०९ मध्ये पहिल्यांदा वाफेचे इंजिनाच्या सहाय्याने धावली होती़ त्यानंतर १९८५ पासून डिझेलवर धावणाऱ्या रेल्वेचे यावर्षी आधुनिकीकरण झाले आहे.विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यातधुळे - चाळीसगाव पॅसेंजर गाडीसाठी विजेच्या तारा टाकण्याचे दोन्ही बाजूचे काम प्रगतीपथावर आहे़ लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे़ सध्या धुळयातील प्रताप मिल ते चाळीसगाव रेल्वेस्थानकापर्यत विजेचे खांब, भुमिगत वायर, पथदिवे, दिशा दर्शनक फलकांचे काम सुरू आहे़ या रेल्वेला नऊ ठिकाणी थांबा आहे. मात्र तांत्रिक कामामुळे २४ फेबु्रवारीपासुन धुळे -चाळीसगाव धावणारी पॅसेंजर क्रमांक ५११४ व चाळीसगाव -धुळे पॅसेंजर क्रमांक ५११५ रद्द करण्यात आल्या आहे़ मात्र लवकरच या गाडीचा वेग वाढणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता वाढली आहे.प्लॅटफार्मचे रूंदीकरणसुरक्षेच्या दुष्टीने रेल्वे विभागाने धुळे, शिरूड, जामदा रेल्वे स्थानकाचे रूंदीकरण केले आहे़ त्यासाठी तिन्ही रेल्वे स्थानकांवर विजेची डीपी बसविण्यात येत आहे़ तर जामदा स्थानकावर जमिनीतून भुयारी बोगदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे़व्यापारात रेल्वेचा योगदानधुळ्यातील प्रताप मिल तसेच दुध उत्पादनात जिल्हा अग्रस्थानी होता़ दळणवळणासाठी चाळीसगाव रेल्वेस्थानक ते धुळ्यातील प्रताप मिल असा ५६ किमी पर्यत ही रेल्वे गाडी सेवा देत होती़ त्यामुळे या रेल्वेला ‘दुधगाडी’ असे देखील म्हटले जात होते़ कालांतराने प्रताप मिल व दुग्ध उत्पादनास उतरती कळा लागली आणि ही गाडी शेतकरी, शेतमंजूर, गरीबांची प्रवासी वाहतूक करणारा ‘गरीब रथ’ म्हणून ओळखला जावू लागला़रेल्वेची पाहिला फेरीविजेच्या काम पूर्ण झाल्याने बुधवारी सकाळी ६ वाजता चाळीसगाव- धुळे या मार्गावर विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता़ चाळीसगाव-धुळे रेल्वेला विजेचे इंजिन लावुन ५६ किमीचा पहिला प्रवास यशस्वी झाला होता़ यावेळी रेल्वे आधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली होती़ हा चाचणी यशस्वी झाल्याने १६ मे पासुन धुळे-चाळीसगाव रेल्वे विजेच्या इंजिनवर धावणार असल्याची माहीती रेल्वे सुत्रां कडून देण्यात आली़
तब्बल ११० वर्षांनी विजेवर धावली रेल्वे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:21 PM