आॅनलाइन लोकमतधुळे : ए आई पावसात मला जाऊ दे...रिमझिम पाऊस पडे सारखा...सुंदर साजिरा सावन आला... यासारखी एकाहून एक सरस पावसाची गाणी त्याचबरोबर देशभक्ती व कोळी गितांवर लहानग्यांनी केलेली नृत्य...तसेच विद्यार्थ्यांनी खडखडीत आवाजात सादर केलेल्या कथाकथनांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. बालकलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराला सर्वांनीच दाद मिळाली.निमित्त होते स्व.ताराबाई मोडक स्मृतिनिमित्त आयोजित ‘मेघमल्हार २०१९’ कार्यक्रमाचे. महाराष्टÑ बालशिक्षण परिषद व स्त्री शिक्षण संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन कै. डॉ. जगन्नाथ वाणी सभागृह, कमलाबाई कन्या शाळा, धुळे येथे करण्यात आले होते. ‘मेघ मल्हार’चे हे तिसरे वर्ष होते. या कार्यक्रमात शहर व परिसरातील २१ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.गेल्या दोन वर्षांपर्यंत झालेल्या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मान्यवरांच्याहस्ते होते होते. मात्र यावर्षी प्रथमच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्तेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या संचालिका मंगला कुळकर्णी होत्या. व्यासपीठावर जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. अरूण साळुंखे, रेखा मुंदडा, मुख्याध्यापिका मनीषा ठाकरे, सुलभा भानगावकर, अनघा ओक, अरूणा नाईक, साधना मानेकर, मनीषा जोशी, शिल्पा म्हस्कर, कल्पना मोरे, केतकी म्हस्कर, मनीषा सोनवणे आदी होत्या.प्रथम सत्रात लताबाई आगीवाल बालमंदिराच्या विद्यार्थ्यांनी ‘देस रंगीला रंगीला..’ या देशभक्तीपर गितावर नृत्य सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर जयहिंदच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘रिमझिम पाऊस पडे सारखा..’ हे पाऊस गाणे सादर केले. कमलाबाई प्र. दलाल शाळेच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘आला आला पाऊस आला..’, चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘ टप टप टप थेंब वाजती गाणी गातो वारा’ हे गीत सादर केले. तर लताबाई आगीवाल बालमंदिराच्या चिमुकल्यांनी ‘कोळी वाड्याची शान आई तुझे देऊळ’ या गीतावर कोळी नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. ‘ ए आई मला पावसात जाऊ दे..’या गाण्यालाही दाद मिळाली होती. यानंतर चिमुकल्यांनी विविध विषयांवर कथाकथन केले. त्यालाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली. टाळ्या वाजवून अनेकांनी छोट्या कलावंताचे कौतुक केले.यावेळी बोलतांना मंगला कुळकर्णी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायला पाहिजे. तर ऐतिहासिक कथेतून आदर्श पिढी निर्माण करता येते असे रेखा मुंदडे यांनी सांगितले.सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन अरूणा पानपाटील, सोनाली धारणे तर दुपारच्या सत्रात सुजय भालेराव, केदार नाईक यांनी सूत्रसंचालन केले. आभार मेघा शुक्ल यांनी मानले.
धुळे येथील ‘मेघ मल्हार’ कार्यक्रमात सादर झालेली पाऊस गाणी, रंजक कथांनी उपस्थित भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:58 AM
२१ शाळांचे संघ सहभागी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव
ठळक मुद्देकार्यक्रमात २१ शाळांचा सहभागविद्यार्थ्यांनी सादर केली पाऊस गाणीकथाकथनाने कार्यक्रमात आणली रंगत