पथदिवे लावा
धुळे : येथील साक्री रोडचे डांबरीकरण आणि दुभाजकाचे काम पूर्ण होऊन दीड वर्ष लोटले तरी अजूनपर्यंत पथदिवे लावले नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. या रस्त्यावर त्वरित पथदिवे लावण्याची गरज आहे.
मोठे गतिरोधक नको
धुळे : तालुक्यातील नवलनगर येथे रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठमोठे गतिरोधक आहेत. पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसत नाहीत. त्यामुळे नवीन वाहनचालकांना कळत नाही. गतिरोधक काढणे आवश्यक आहे.
आरटीओंनी लक्ष द्यावे
धुळे : शहरात तसेच ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहन चालक म्हणून तज्ज्ञांकडून प्रशिक्षण न घेता तरुण ट्रॅक्टर चालवू लागले आहेत. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेग असतो. आरटीओ विभागाने लक्ष द्यावे.
पाण्यासाठी वणवण
धुळे : उन्हाळ्यात पाणी वापरण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. महिलांना पिण्याचे पाणी दूरवर जाऊन आणावले लागत आहे. महिलांसोबतच मुलांनादेखील पाण्यासाठी उन्हात जावे लागते.