शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीने लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 9:33 PM

बंदला समिश्र प्रतिसाद : हिंदूत्ववादी संघटनांनी नोंदविला सहभाग

धुळे : केंद्र शासनाच्या ‘एनआरसी’ व ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ शहरातील हिंदूत्ववादी संघटनांतर्फे रविवारी विराट तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीत तरूणांनी हातात घेतलेल्या १५० मीटरच्या ध्वजाने शहरवासियांचे लक्ष वेधले होते.श्रीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, भाजप यांच्यासह शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीची सुरूवात मालेगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली़ ही रॅली पाच कंदील चौक, आग्रारोड, जुन्या मनपाजवळ पोहचली.तेथे फटाके फोडून रॅलीचे स्वागत करण्यात आले़ त्यानंतर महापालिकेच्या नूतन इमारतीकडून क्युमाईन क्लबमार्गे रॅली जेलरोडवर पोहचली. तेथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी विविध घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. याशिवाय युवकांनी १५० मीटर लांबीचा तिरंगा झेंडा ध्वज धरला होता. या ध्वजाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल चार तास ही रॅली सुरू होती.यावेळी संघटनेचे प्रचारक दत्ता बागुल यांनी एनआरसी व सीएए कायद्याबाबत मार्गदर्शन केले. बागूल यांनी केंद्र शासनाच्या बिलाचे समर्थन करुन त्याविरोधात अपप्रचार केली जात असल्याची टीका त्यांनी केली. या समर्थनार्थ रॅलीत खासदार डॉ़ सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अपंळकर, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबन चौधरी, हिरामण गवळी, देवेंद्र सोनार, भिकन वराडे, विजय पाच्छापूरकर, नगरसेवका प्रतिभा चौधरी, भारती माळी, संजय शर्मा आदी सहभागी झाले होते़व्यापाऱ्यांनी ठेवले दुकाने बंदकायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत व्यापाऱ्यांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून ते सहभागी झाले होते. त्यामुळे शहराची बाजारपेठ ठप्प झाली होती. दुपारी रॅली संपल्यानंतर व्यवहार पूर्ववत सुरूझाले.

टॅग्स :Dhuleधुळे