धुळे/कुसुंबा : राज्य सहकारी बॅँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरूद्ध दाखल गुन्ह्याचा जिल्हा व राष्टÑवादी युवक कॉँग्रेसतर्फे रास्तारोको व निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला. ही कारवाई निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाºयांनी केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वात कुसुंबा येथील राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहावर गुरूवारी सकाळी सुमारे अर्धा तास रास्तारोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात जगदिश रायते, भगवान भिल, सुधाकर जाधव, प्रकाश शिंदे, अतुल जैन, बाबा कारंकाळ, कैलास सोनवणे, इंद्रदास रायते, शशिकांत सैंदाणे, आनंद महाले, जितेंद्र विनायक शिंदे, प्रतापराव शिंदे, भगवंत शिंदे, नितीन शिंदे, लोटन बापू शिंदे, आनंद सावंत, मुस्ताक शेख, भटू नेरकर, दिनेश रायते, दामू पारधी, भिकन पारधी, निंबा कुंभार, दिलीप शिंदे, चंद्रकांत चौधरी, सुनिल शिंदे, रविंद्र पारधी, शेख जब्बार, प्रकाश शिंदे, गुलाब निकम, सतीष निकम, राजेंद्र शिंदे, दिलीप महाजन, पप्पू शिंदे, जगदिश शिंदे आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक वाहनांच्या रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.मात्र पोलिसांच्या महत्प्रयासानंतर ही वाहतूक सुरळीत होऊ शकली. प्रशासनाला निवेदन युवक राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला. शरद पवार कोणत्याही बॅँकेचे संचालक नसताना त्यांच्यावर दाखल हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पदाधिकाºयांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुसुंबा येथे रास्तारोको आंदोलन, धुळ्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:23 PM