शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मानव समाजासाठी खरी गरज नितीमूल्यांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 9:54 PM

संडे अँकर । प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राजयोगीनी विजयादिदिंचे प्रतिपादन

विशाल गांगुर्डे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : मानव समाजाला खरी गरज नितीमूल्यांची आहे. एकजुटीनं प्रामाणिक प्रयत्न केल्यास सर्व समस्या प्रश्नांवर उपाय शक्य आहे. आपापसातील द्वेष, वैरभाव, तिरस्कार विसरून परस्पर सहयोग, आदर, प्रेमसारखी नितीमूल्य समाजात बाणवण्याची आज आवश्यकता आहे असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी विजयादीदी यांनी प्रतिपादन केले.साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथीले प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘नितीमूल्याधिष्ठीत समाजाचे निर्माण’ ह्या ब्रम्हाकुमारीजच्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागाची आता खरी गरज आहे, असे सांगत दीदींनी सर्वांना केंद्रास भेट देण्याचे आवाहन केले.  घनश्याम पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती जेव्हा ज्याही स्थितीत असते त्याला ती स्वत:च सर्वस्वी जबाबदार असते. कर्माची गती अतिशय गुह्य आहे, आपले विचारवाणी कर्मच आपलं नशिब घडवत असतात. तेव्हा आपल्या विचारवाणी कर्मांवर आपले लक्ष असावे. त्यानंतर प्रकाश क्षीरसागर, प्रभाकर भाई, भोगेभाई यांनीही सभेस मार्गदर्शन केले. तत्पूर्वी उषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून सद्भावना फेरी काढण्यात आली. देशशिरवाडे गावाचे सरपंच सुमर्न ठाकरे, उपसरपंच निलेश पगारे, जि.प. सदस्य विलास बिरारीस, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच विजय महाजन यांच्या उपस्थितीत ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तथा ध्वजारोहण पार पडले.  शेवटी सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास धुळे, नंदुरबार, नेर, अंतापुर, जायखेडा, बल्हाणे, चिकसे, पानखेडा, सामोडे, पिंपळनेर तथा परिसरातून बी.के.परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम सोनवणे, साधना जगताप, दिगंबर सोनवणे, रुपाली पगारे, रोहिणी हिरे, पार्वती सोनवणे, काशिनाथ दुसाने, गुरुदत घरटे आदींनी परिश्रम घेतले.

उपाय तोकडे़़आजचा मनुष्य हा अनेकानेक समस्यांनी ग्रस्त दिसतो, सर्वच क्षेत्रात सततची जीवघेणी स्पर्धा, स्वास्थ्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, त्यातच पुन्हा दुष्काळ, नापिकी, पाणी टंचाई सारख्या नैसर्गिक आपदा, या सर्वांनी तो पुरता हतबल झालाय. समस्या सोडवण्यासाठीचे त्याचे सर्वप्रकारचे उपाय तोकडे ठरताहेत. येणारा काळ तर आणखीच भीषण असू शकेल. तेव्हा ह्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे, मानवी प्रयत्नांना अध्यात्माचीही जोड हवी.

टॅग्स :Dhuleधुळे