लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अलिकडे मुले शिकत नाही, केवळ गुण मिळवतात़ त्यामुळे ६ वर्षांच्या आतील मुलांसाठी अर्थात बालशिक्षणासाठी सरकारने पुरेशी गुंतवणूक केली तरच पुढील पिढी चांगली मिळू शकेल़ क्षमता विकासावर आधारीत बालशिक्षण ही काळाची गरज असून त्यात धुळयाने घेतलेला पुढाकार ही गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन बालशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा़ रमेश पानसे यांनी धुळयात आयोजित व्याख्यानात केले़शहरातील स्त्री शिक्षण संस्था व बालशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम शिक्षक तयार व्हावेत यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली उपयुक्त अभ्यासवर्ग तसेच बालवाडी शिक्षकांसाठी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा़ रमेश पानसे यांनी भुमिका विषद केली़ यावेळी स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी, पी़डी़दलाल, ऱवि़बेलपाठक, बाळकृष्ण बोकील, जयश्री बोकील, डॉ़ दिनेश नेहेतेमनिषा जोशी, वासंती जोशी, डॉ़ अरूणा नाईक, सुलभा भानगावकर, नंदलाल रूणवाल, कमलाबाई कन्या शाळेत प्रा़ रमेश पानसे यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले़ व्याख्यानात बोलतांना प्रा़ पानसे यांनी डिएड, बीएड करणाºया सर्व भावी शिक्षकांनी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली उपयुक्त अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले़