शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

‘त्या’ रस्त्यांना ‘एनओसी’ देण्यास नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2017 11:45 PM

महापालिका : पांझरा नदीकिनारी प्रस्तावित रस्त्यांचा प्रश्न, अजून ना-हरकत मागितली नाही-आमदार

धुळे : शहरातील पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच किमीचे रस्ते तयार करण्यासाठी मुख्यमंत्री स्वेच्छा निधीतून पहिल्या टप्प्यात ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, प्रस्तावित करण्यात आलेल्या या रस्त्यांना ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्यास महापालिकेने नकार दिला असून हे रस्ते पूररेषेमुळे बाधित होऊ शकतात, असे मनपाचे म्हणणे आहे़ शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आयुक्त व महापौरांकडे या रस्त्यांना ना-हरकत न देण्याची मागणी केली होती़ दुसरीकडे प्रस्तावित रस्त्यांसाठी अद्याप ना हरकत मागितलीच नसल्याची स्पष्ट भूमिका आमदार अनिल गोटे यांनी मांडली आहे़अशी होती मागणी़़़शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी २८ फेब्रुवारी २०१७ ला मनपा आयुक्त व महापौर यांना दिलेल्या पत्रानुसार, शासनाने पांझरा नदीकाठाजवळील रस्ते बांधकामासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे़ त्यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे़ मात्र, सदर निधी महापालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीच्या खर्चाचे धोरण व त्यानुषंगाने ठराव करण्याचा अधिकार महापालिकेच्या लोकल बॉडीचा आहे़ त्यामुळे तो ठरावाप्रमाणे खर्च झाला पाहिजे़ सदर कामासाठी परस्पर ना-हरकत देऊ नये़  सदर काम मोठ्या स्वरुपाचे असल्याने सुचवलेल्या रस्त्यांवर अनेक खासगी, शासकीय मालमत्ता आहेत, रस्ता हा पांझरा नदीपात्रातून दर्शविला गेल्याने पूररेषा बाधित होणार आहे तसेच शहर विकास आराखड्यात याठिकाणी रस्त्यांची तरतूद नाही़  त्यामुळे नियमांची मोडतोड करून तयार करण्यात येत असल्याने ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये़ यापूर्वी मनपा आयुक्तांनी तळफरशीच्या कामाला ना -हरकत देऊन अटी-शर्तींचे उल्लंघन केले आहे़ सदर रस्त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी महासभेत चर्चा करण्यापूर्वी भूमीअभिलेख, जिल्हा भूमापन कार्यालय, पर्यावरण विभाग, जलसिंचन विभाग, प्रदूषण विभाग व हरित लवाद यांच्या परवानग्या आवश्यक आहेत़  तसेच नदीपात्रात रस्ते बांधून नदीपात्र रूंद करण्याचा अधिकार कुणालाही नसून भविष्यात पुरामुळे आपत्ती आल्यास जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे राजकीय दबावात ना-हरकत दिल्यास कायदेशीर दाद मागण्यात येईल, असे परदेशी यांच्या पत्रात नमुद आहे़ मनपाचे बांधकाम विभागाला पत्रपरदेशी यांच्या मागणीनंतर मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले असून या पत्रानुसार, ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी बांधकाम विभागाने केली असती तरी सोबत अंदाजपत्रक व आराखडे सादर केलेले नाही़ तसेच शहर मंजूर विकास योजनेत सदरचा रस्ता अखंडपणे दर्शवण्यात आलेला नाही, सदर रस्ता सध्या अस्तित्वात नसल्याने व त्याबाबतची जागा मनपा मालकीची नसल्याने संबंधितांकडून भूसंपादन करावी लागेल़ मंजूर विकास योजनेत रस्ता अखंड नसल्याने त्याबाबत ‘ना-हरकत’ देता येणार नाही, असे पत्र मनपा उपायुक्तांनी बांधकाम विभागाला दिले आहे़बांधकाम विभागावर कारवाई करा...नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी नगरविकास विभागाच्या सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र देऊन सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे़ बांधकाम विभागाकडून नियम डावलून पांझरा नदीकाठच्या रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला जात असून सदरचा प्रस्ताव रद्द करावा, नदीकाठाजवळ अतिक्रमणे, राहती घरे व व्यवसाय असून त्यातून रस्ता जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधितांचे पुनर्वसन करावे लागणार असून त्यासाठी भूसंपादनदेखील करावे लागेल़ तरी सदर प्रस्तावाला मान्यता न देता अभियंता भदाणे यांची विभागीय खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणीही परदेशी यांनी केली आहे़