शिंदखेडा : तालुक्यातील जोगशेलू येथील जागृत देवस्थान श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिराचे लोकवर्गणीतून नवीन रूप देण्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. जवळपास १२ समाजाचे कुलदैवत असलेल्या या देवस्थानचे समाजबांधवांमार्फत बांधकाम साहित्य व रोख स्वरूपातील मदत घेऊन चालू आहे. दुष्काळी परिस्तिथी झाल्यामुळे थांबले असून पुढील काम हे कलाकुसरीचे काम असल्यामुळे खर्च खूप येणार असल्याने अधिक मदत अपेक्षित आहे. सदर कार्याबरोबर पुढील काळात विविध सुविधा देण्यात येणार आहे. नुकतेच देवस्थानचे सुंदर प्रवेशद्वाराचे काम सुरु झाले. परीसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे सुशोभीकरण काम सुद्धा होणार आहे. गावाला मंदिरात येणारे चारही रस्त्याचे काम मंजूर झाले आहेत. मंदिरात दरवर्षाला चैत्रोत्सव व नवरात्रीच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने भाविक येतात. या मंदिरामुळे परिसर तालुक्यातील ग्रामस्थ भविष्यात मोठे श्री जोगेश्वरी माता प्रचंड मोठे देवस्थान होणार असून व्यापार, रोजगार वाढणार असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
जोगेश्वरी देवस्थानचे लोकवर्गणीतून नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:44 AM
सुविधा : मंदिरात येणाºया चारही रस्त्यांचे काम मंजूर
ठळक मुद्देसुविधा : मंदिरात येणाया चारही रस्त्यांचे काम मंजूर