लोकमत न्यूज नेटवर्कतºहाडी : शिरपूर तालुक्यात दिवसभरात बरेच रूग्ण पॉझिटिव्ह आढळलेत यात तºहाडी येथील चार नव्याने रुग्णांचा समावेश आहे. याबाबत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना अहवाल प्राप्त झाला असून संबंधित रुग्णांना उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्याशिरपूर शहरात दिवसभरात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये चार रुग्ण तºहाडी येथील आहेत. यात दोन पुरुष व दोन महिलेंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तºहाडी गाव याआधीच सील करण्यात आले असून गावात ज्या भागात बाधित रुग्ण सापडले त्या भागात ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्यावतीने निजंर्तुकीकरण फवारणी करण्यात आली. सकाळी आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप पावरा व त्यांचे कर्मचारी संबंधित भागाची पाहणी करून निजंर्तुकीकरण काम काम वेगाने सुरू होते. ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागात सरपंच जयश्री धनगर, उपसरपंच गणेश भामरे, ग्रामसेवक जी.वाय.पाटील, पोलीस पाटील, प्रतापसिंह गिरासे मंडळ अधिकारी बी.ए.बोरसे तलाठी भारती पवार यांनी भेट दिली. ग्रामपंचायतीतर्फे बाधित क्षेत्रात सील करण्यात आले. संबंधित रुग्णांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आरोग्य सहाय्यक डॉ.पी.सी. वाघ, परिचारीका दिपाली बडगुजर, डॉ.रवींद्र शिरसाठ आदींसह नर्स आरोग्यसेविका रुग्णांच्या उपचारासाठी सर्व पथक सज्ज झाली आहे.दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे.
तºहाडीत चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:48 PM