धुळे : शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्र व राज्य सरकारची संयुक्त समिती शहरात दाखल होणार आह़े त्या पाश्र्वभूमीवर मनपाकडून स्वच्छतेवर भर दिला जात असताना स्वच्छता ‘अॅप’वर खुद्द प्रांताधिका:यांनी केलेल्या तक्रारीकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आह़े त्यामुळे सदर तक्रारीची तातडीने दखल घेणे आवश्यक आह़ेशहरातील स्वच्छतेबाबत तक्रारी मांडण्यासाठी स्वच्छता हे अॅप शासनाने नागरिकांना उपलब्ध करून दिले आह़े सदर अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आह़े दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सायकलवर फेरफटका मारण्यासाठी गेलो असता ऐंशीफुटी रोडवरील शिवाजीनगर, वैभवनगरातील प्रसन्न हनुमान मंदिर परिसरात तसेच मौलवीगंज भागात अस्वच्छता दिसून आली़ ओसांडून वाहणारी कचराकुंडी व त्याठिकाणी जमलेल्या मोकाट गुरांचे छायाचित्र काढून तत्काळ स्वच्छता ‘अॅप’वर फोटोंसह टाकून तक्रार नोंदविल्याचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र सदर तक्रारीस 21 तासांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही सोडवणूक करण्यात आलेली नव्हती़ संबंधित अॅप अॅण्ड्राईड मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येतो़ त्यावर संबंधित ग्राहकांचा मोबाइल क्रमांक व आनुषंगिक माहितीची नोंदणी केल्यानंतर छायाचित्र काढता येत़े तक्रारीसह सदरचे छायाचित्र अॅपवरून जीओटॅगद्वारे तक्रारीच्या जागेसह स्वच्छता निरीक्षकाकडे प्राप्त होत़े अॅपवर प्राप्त तक्रारीचे निवारण 12 तास करणे क्रमप्राप्त असून त्यास केंद्रीय समितीकडून गुणांकन केले जाणार आह़े त्यामुळे अॅपची जनजागृती व तक्रारींची दखल घेणे आवश्यक आहे.
प्रांताधिका:यांनी वेधले अस्वच्छतेकडे लक्ष!
By admin | Published: January 18, 2017 11:42 PM