लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्यातील अघोषीत विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना अनुदान घोषीत करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. परंतु, या आंदोलनानंतरही राज्य शासनातर्फे अघोषीत शिक्षकांच्या अनुदानाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत राज्य अघोषीत शिक्षक -शिक्षिका आंदोलन समितीच्या वतीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांना धुळ्यात निवेदन देण्यात आले होते. त्यांनी या निवेदनाची दखल घेतली. त्यानुसार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र दिले.
धुळ्यातील शिक्षक भारती संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:39 AM
मागणी : विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदान द्या
ठळक मुद्देतसेच त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई येथे शिक्षणमंत्री तावडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन शिक्षणमंत्री तावडे यांनी येथे दिले. यावेळी शुभांगी पाटील, विवेक पाटील, अॅड. विवेक सूर्यवंशी, गजेंद्र अपळकर, डॉ. शेशराव पाटील, प्रतिभा अजळकर, योगेश साळुंखे उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणमंत्री तावडे यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात अघोषीत शाळा अनुदानासह घोषीत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.