लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने १९ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. नासिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोरही आंदोलन गेल्या २७ दिवसांपासून सुरू आहे. महसूल विभागातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करावा ही कोतवालांची ४०-५० वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीसाठी राज्यातील सर्व कोतवाल नासिक येथे आंदोलनात सहभागी झाले आहेत. संपूर्ण राज्यभर कोतवालांचे बेमुदत काम बंद आंदोलनामुळे या दरम्यान धुळे जिल्ह्यातील महसूल विभागांतर्गत येणाºया कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.नाशिक येथील आंदोलनात कोतवालांच्या मागण्या अशा आहेत. शासनाने वेळोवेळी कोतवालांची दिशाभूल करून ४०-५० वर्षापासून कोतवालवर अन्याय करत आहे. २४ तास शासनाची सेवा बजावणे, शासनाची वसुली करणे, निवडणुकीची कामे इत्यादी २०० ते २५० कामे कोतवाल करत आहे. एवढे असूनही शासन कोतवालांच्या मागणी बाबत सकारात्मनक निर्णय घेत नसल्यामुळे कोतवालवर्गात नाराजीचा सुरू येत आहे. तसेच गेल्या २७ दिवसापासून नासिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपल्या मागणीसाठी कोतवाल लढा देत आहेत. परंतु शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने सुरू असलेले आंदोलन हे जोपर्यंत शासन कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करत नाही तोपर्यंत नासिक विभागीय आयुक्त कार्यालया समोरील आंदोलन हे सुरुच राहणार, असा पक्का निर्धार महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या सर्व पदाधिकाºयांनी केलेला आहे, असे मत राज्य संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले यांनी व्यक्त केले आहे. या आंदोलनात उपाध्यक्ष सुमित गमरे, सरचिटणीस भारत पवार, मार्गदशक बापू आहिरे, राज्य संपर्क प्रमुख बाळू झोरे, नितीन चंदन, रवींद्र भामरे, विवेक देशमुख, गणेश गोसावी, जयवंत जाधव, पदाधिकारी व कोतवाल सहभागी आहेत.
कोतवालांच्या आंदोलनामुळे महसूल कामावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:43 PM