धुळे : साक्री तालुक्यातील वासखेडी रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून रंगलेला पत्त्याचा डाव उधळून लावला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून, निजामपूर पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राेख रकमेसह विविध साहित्य, अशा एकूण ४ लाख ६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
साक्री तालुक्यातील वासखेडी रोडवर नॅशनल सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे काही इसम हे पत्त्यांचा हार-जीतचा डाव खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच खात्री करून बुधवारी सायंकाळी पथकाने छापा टाकला. त्यावेळी रंगलेला पत्त्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. यावेळी दिलीप आसाराम धनगर (वय २३, रा. जैताणे, ता. साक्री), संजय सुदाम जैस्वाल (२७, रा. निजामपूर, ता. साक्री), संदीप भगवान भलकारे (२६, रा. जैताणे, ता. साक्री), नाजीम जब्बार शहा (२७, रा. जैताणे, ता. साक्री), मुस्तकीन अरमान शहा (२६, रा. निजामपूर, ता. साक्री), बबन उत्तम खलाणे (२५, रा. जैताणे, ता. साक्री), बारकू वंजी बच्छाव (२८, रा. जैताणे, ता. साक्री), रवींद्र नारायण पवार (२८, रा. निजामपूर, ता. साक्री), दिलीप दगा धनगर (२७, रा. जैताणे, ता. साक्री), दिलीप शंकर अहिरे (२८, रा. जैताणे, ता. साक्री) यांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास निजामपूर पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप खोंडे, कर्मचारी देवेंद्र ठाकूर, राजू गीते यांनी केली.