शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

साक्री-पिंपळनेर रस्त्यावर ‘रास्ता रोको’

By admin | Published: January 10, 2017 11:46 PM

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापा:यांनी कांद्याचे भाव पाडल्याने संतप्त शेतक:यांनी उद्घाटनानंतर लगेचच साक्री-पिंपळनेर रस्त्यावर ‘रास्ता रोको’ करीत संताप व्यक्त केला.

साक्री :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांदा खरेदी उद्घाटनाच्या दिवशीच व्यापा:यांनी कांद्याचे भाव पाडल्याने संतप्त शेतक:यांनी उद्घाटनानंतर लगेचच साक्री-पिंपळनेर रस्त्यावर ‘रास्ता रोको’ करीत संताप व्यक्त केला. अखेर साक्री पोलिसांनी हस्तक्षेप केला. शेतक:यांना विश्वासात घेऊन प्रती क्विंटल 40 रुपये भाव वाढवून दिले. त्यानंतर शेतक:यांनी आंदोलन मागे घेतले. उन्हाळी कांदा मातीमोल झाल्याने शेतकरी अगोदरच संकटात सापडला आहेत. त्यानंतर पावसाळी कांदा विक्रीसाठी शेतक:यांना सोयीचे व्हावे, म्हणून साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन ठेवण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतक:यांनी पहिल्या दिवशी मोठय़ा प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर व्यापा:यांनी कांदा खरेदीला सुरुवात केली. परंतु,  बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दर व्यापा:यांनी पुकारल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केला. सर्व संतप्त शेतक:यांनी मार्केटच्या बाहेर सर्व वाहने आणून ‘साक्री पिंपळनेर’ रस्त्यावर रास्ता जाम केला. याबाबत साक्री पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शेतकरी व व्यापारी यांची बैठक घेऊन प्रती क्विंटलमागे भाव वाढवून दिले.  चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमाल 100 ते किमान 500 रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात आला. परंतु, इतर मार्केटमध्ये जास्त दर मिळत असल्याने शेतकरी अधिकच संतापले होते. शेतक:यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडणारे नेते मात्र, शेतक:यांच्या पाठीशी धावून न आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शेतक:यांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता़

मंगळवारी कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन नियोजित होते. परंतु, सभापती व इतर संचालक उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. त्यामुळे इतर संचालकांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. सभापती पोपटराव सोनवणे हे नोटाबंदीच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली येथे गेल्याचे समजले आहे. दरम्यान, अर्धा तास आंदोलन सुरू असल्यामुळे साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.