शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लोकवर्गणीतून रस्ता साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:37 AM

यावेळी सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, व्हा. चेअरमन दिलीप भामरे, राजेंद्र देसले, धर्मराज निकम, रमेश भामरे, दत्तात्रय देसले, रमेश मराठे, ...

यावेळी सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, व्हा. चेअरमन दिलीप भामरे, राजेंद्र देसले, धर्मराज निकम, रमेश भामरे, दत्तात्रय देसले, रमेश मराठे, कैलास तलवारे, नंदू शिंपी, राकेश पाटील, संतोष ठाकूर, श्याम पवार, योगेश देसले, राजू पाटील, बबलू बडगुजर महेंद्र मराठेसह शेतकरी उपस्थित होते.

शिंदखेडा शिवारातील शिंदखेडा ते विरदेल शहरापासून २ किमी अंतरावर जुना खोपडी रस्ता आहे. या रस्त्यावर आजपर्यंत साधा मुरूमदेखील टाकण्यात आलेला नव्हता. शिंदखेडा शहरातील शेतकऱ्यांच्या या शिवारात जमिनी आहेत. या रस्त्यावर काळी माती असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल होतो. अरुंद रस्ता आणि चिखल यामुळे पायी चालणेदेखील अवघड होते. शेतकऱ्यांची बैलगाडी जाणे अशक्य होते. परिणामी शेतीची कामे खोळंबतात. अनेक वेळेस बैलगाडी या रस्त्यावर दोन -दोन दिवस चिखलात अडकलेल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नेहमीच्या या समस्येला शेतकरी त्रस्त झाले. अनेकवेळेस तक्रारी करूनदेखील या समस्येकडे शासन, प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पीक सरंक्षण सोसायटीने दीड किमी रस्त्यासाठी दीड लाख लोकवर्गणी गोळा करून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवातदेखील केली आहे. आठ दिवसात रस्त्यावर खडी, मुरूम टाकून काम पूर्ण होईल, असे सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी यांनी सांगितले. या अगोदरदेखील अशाचप्रकारे जुना अमळथे रस्तादेखील लोकवर्गणीतून बनवला आहे. सोसायटीच्या या कामांमुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.