साक्री :साक्री तालुक्यातील कळंभीर गावाजवळ असलेल्या रायपूर घाटात धुळे येथील व्यापाºयास लुटल्या प्रकरणी जैताने येथील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे .धुळे येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी अमोल भोकरे हे आपल्या वसुलीसाठी साक्री तालुक्यात आले होते. निजामपूर येथून वसुली करून परत येत असताना रायपूर घाटात दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी त्यांच्या दुचाकी समोर गाडी आडवी लावून शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून २ लाख ७० हजार रुपये व एक मोबाईल आरोपींनी लुटून नेला होता. यावेळेस दोन दुचाकीवर सहा आरोपी आले होते. भरदिवसा झालेल्या या रस्ता लुटीमुळे एकच खळबळ उडाली होती. साक्री पोलीसात या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक देविदास डुमणे, पोलीस उप निरीक्षक महेश जाधव, पोलीस नाईक एस. जी. शिरसाट, संजय जाधव, विजय पाटील, तुषार बाविस्कर, राज पाटील, या चौकशी पथकाने तपास चक्रे फिरविली. अवघ्या चौवीस तासात पोलिसांनी जैताने येथील पवन अभिमान मराठ,े अर्जुन दासभाऊ सोनवणे, चंद्रकांत भगवान जाधव, शशिकांत गोकुळ अहिरे यांना अटक केली आहे. तर टिल्लुराम वसंत चौधरी हा फरार झाला आहे. त्याला व घटनेत वापरलेल्या दुचाकीचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. आरोपीने लुटून नेली रक्कम ताब्यात घेण्याचे बाकी आहे.
व्यापाऱ्याला लुटणाºया पाच आरोपींना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:03 PM