शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

रोहयोची भिस्त 15 हजार मजुरांवर!

By admin | Published: March 01, 2017 12:00 AM

जिल्हा परिषद : सर्वाधिक साक्री तालुक्यात, तर शिरपुरात कमी कामांचा समावेश

धुळे : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत रोजगार हमी योजनेची कामे जिल्हाभरात सुरू आहेत़ 1 हजार 427 कामांवर 15 हजार 557 मजूर कार्यरत आहेत़ विशेष म्हणजे सर्वाधिक साक्री तालुक्यात, तर कमी शिरपूर तालुक्यात कामे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ सिंचन विहिरींची कामे धुळे तालुक्यात 124 ठिकाणी सुरू आहेत़ त्यावर 1 हजार 417 मजूर कार्यरत आहेत़ साक्रीत 369 कामांवर 3 हजार 514 मजूर, शिंदखेडय़ात 448 कामांवर 6 हजार 14 मजूर आणि शिरपुरात 160 कामांवर 1 हजार 827 मजूर काम करत आहेत़ सार्वजनिक विहिरींची कामे धुळे तालुक्यात 5 ठिकाणी सुरू आहेत़ त्यावर 85 मजूर काम करत आह़े शिंदखेडय़ात 2 कामांवर 47 मजूर आहेत़ साक्री आणि शिरपूर तालुक्यात एकही काम देण्यात आलेले नाही़ वृक्ष लागवडीचे काम धुळे तालुक्यात केवळ एकाच ठिकाणी सुरू असून त्यावर 4 मजूर काम करत आहेत़ शिरपूर तालुक्यात 11 कामांवर 70 मजूर आहेत़ साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकही काम सुरू नाही़ फळबाग लागवडीची धुळे तालुक्यात 26 कामे सुरू असून त्यावर 93 मजूर आहेत़ साक्री तालुक्यात 79 कामांवर 340 मजूर आणि शिंदखेडा तालुक्यात एका कामावर केवळ 6 मजूर काम करत आहेत़ शिरपूर तालुक्यात एकही काम सुरू नाही़ शेततळ्यांची कामे केवळ साक्री तालुक्यातच मार्गी लावली जात आहेत़ त्यात 12 कामांवर 117 मजूर काम करत आहेत़ धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात एकही काम नियोजित करण्यात आलेले नाही़ मातीबांधाची कामे काही ठिकाणी सुरू आहेत़ त्यात धुळे तालुक्यात 33 कामांवर 1 हजार 161  आणि शिरपूर तालुक्यात 2 कामांवर 139 मजूर कार्यरत आहेत़ साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकही काम सुरू नाही़ गांडूळ खताबाबतचे केवळ साक्री तालुक्यातच काम मार्गी लावले जात आह़े त्यात 2 कामांवर 8 मजूर कार्यरत आहेत़ धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात एकही काम देण्यात आलेले नाही़ इंदिरा आवास घरकुलाचीही कामे मार्गी लावले जात आहेत़ त्यात धुळे तालुक्यात 7 कामांवर 16 मजूर, साक्री 16 कामांवर 64 मजूर, शिंदखेडय़ात 2 कामांवर 6 मजूर आणि शिरपुरात 65 कामांवर 273 मजूर कार्यरत आहेत़ गुरांच्या गोठय़ाचे काम केवळ शिरपूर तालुक्यात एकाच ठिकाणी सुरू असून त्यावर 8 मजूर कार्यरत आहेत़ उर्वरित धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकही काम देण्यात आलेले नाही़ शोषखड्डय़ांच्याही कामांचा यात समावेश करण्यात आलेला आह़े यात केवळ धुळे तालुक्यात 6 ठिकाणी काम सुरू असून त्यावर 191 मजूर काम करत आहेत़ उर्वरित साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात याबाबत एकही काम घेण्यात आलेले नाही़ वैयक्तिक शौचालयाच्याही कामांचा यात समावेश आह़े धुळे तालुक्यात 45 कामांवर 124 मजूर कार्यरत आह़े साक्रीत 3 कामांवर 15 मजूर, शिंदखेडय़ात 7 कामांवर 18 मजूर कार्यरत आहेत़ शिरपूर तालुक्यात मात्र एकही काम नसल्याचे आकडेवारीवरून समोर आलेले आह़े एकत्रित कामे लक्षात घेतल्यास धुळे तालुक्यात 247 कामांवर 3 हजार 91 मजूर, साक्री तालुक्यात 481 कामांवर 4 हजार 58 मजूर, शिंदखेडा तालुक्यात 460 कामांवर 6 हजार 91 मजूर आणि शिरपूर तालुक्यात 239 कामांवर 2 हजार 317 मजूर कार्यरत आहेत़ तर रस्ता खडीकरण, विहिरीचे पुनर्भरण, नापेड कंपोस्ट या प्रकारची कामे जिल्ह्यात कुठेही सुरू नाहीत़ जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजनेंतर्गत कामांचा तपशील निश्चित होत असतो़ त्यासाठी मजुरांची संख्या वाढावी यासाठी प्रशासकीय पाठपुरावा सुरू असताना मजुरांनीदेखील पुढे येण्याची गरज आह़े