लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/पिंपळनेर/दोंडाईचा : जिल्ह्यात बुधवारी सकाळी पिंपळनेर, दोंडाईचा आणि शिंदखेडा येथे पोलीस बंदोबस्तात दारु विक्रीला सुरुवात झाली.दारु खरेदीसाठी लोक सकाळपासूनच दारु विक्रीच्या दुकानाबाहेर रांग लावून उभे होते. पिंपळनेरला तर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. भर उन्हात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत गप्पगुमान उभे दिसून आले.कन्टेन्मेट एरियात दारुबंदीजिल्ह्यात धुळे महानगर, शिरपूर शहर आणि कन्टेन्मेट एरियात दारु विक्रीस सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात काही दारु विक्रेत्यांनी मंडप टाकून केलेल्या तयारीचा काहीच उपयोग झालेला दिसून आला नाही. याठिकाणी दारुची दुकाने बंदच होती.शौकिनांची घोर निराशाधुळे शहरातील काही दुकानदारांनी केलेली तयारी पाहता दारु विक्री सुरु होईल, अशी तळीरामांना आशा होती. मात्र मंगळवारी त्यांची निराशा झाली.दखल घेण्यासारखेनोंदणी दारु विक्रीच्या दुकानावर एक रजिस्टर ठेवण्यात आले आहे. त्या रजिस्टरवर दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव व पत्ता नोंदवून ठेवला जात आहे. पिंपळनेर येथे दुकानावर दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटाईज केले जात आहे. एकावेळी एकच ग्राहक दुकानाच्या काऊंटरवर येईल, अशी शिस्त लावण्यात आली आहे. ठराविक कोटा दुकानावर दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीच्या दारुची एक किंवा जास्तीत जास्त दोन बाटल्याच दिल्या जात आहे. लाखोंचा धंदा पिंपळनेर आणि दोंडाईचा शहरात दिवसभर दारु दुकानावर तळीरामांची गर्दी दिसून आली. दिवसभरात पाच लाखांच्यावर धंदा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दोंडाईचात सकाळपासूनच होती गर्दीशासनाला महसुलाची व मद्यपिंना दारूची किती गरज आहे, हे मंगळवारी दोंडाईचा येथे दारुच्या दुकानांसमोर झालेल्या गर्दीवरुन जाणवले. किमान अर्धा किमीच्या रांगेत शिस्तीत उभे राहून क्रमांकाने दारूची तल्लफ असणाऱ्यांनी दारूची बाटली मिळविली़ दारू घेतांना गोंधळ, काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस तैनात होते़ भाजीपाला, किराणा दुकानापेक्षा सर्वात जास्त गर्दी दारूच्या दुकानासमोर दिसून आली.
ग्रामीण भागात भर उन्हात लागली तळीरामांची रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 9:52 PM