नंदुरबार : शहरातील माळीवाडय़ात गेल्या दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलिंडरच्या गळतीने घराला आग लागून वित्तहानी झाली. यानंतर तळोदा येथे आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या सुरक्षेत केलेली कुचराई कशी जीवावर बेतू शकते याचा अनुभव मुंबईत गेल्या महिन्यात आला. त्याचप्रमाणे गॅस सुरक्षेबाबत नंदुरबार शहरातही उदासीनता असल्याचे गॅस बचत-सुरक्षितता पंधरवडा साजरा करण्यात आला. याबाबत गॅस कंपन्यांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात नंदुरबार गॅस कंपनी, बालाजी गॅस एजन्सी आणि कल्याणी गॅस एजन्सी अशा तीन गॅस सिलिंडर पुरविणा:या एजन्सी आहेत. नंदुरबार तालुक्यात 45 हजारांवर ग्राहक आहेत. ‘ अधिकृत मेकॅनिककडून नियमित तपासणी करून घेणा:यांचे प्रमाण केवळ 15 टक्के, तर 20 टक्के कुटुंबे कधी-कधी तपासणी करून घेतात. सिलिंडर घेताना 99 टक्के कुटुंबांनी वजनाची खात्री करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. दरम्यान, प्रशासनानेही सिलिंडर वापरण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याची गरज आहे, असे वाटते.
महिलांची सुरक्षा ‘गॅस’वर
By admin | Published: January 25, 2016 12:19 AM