लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर निजामपूरच्या पूर्वेस वेहेरगाव फाटा, होडदाणे येथे काही चिकून गुनियाचे रुग्ण आढळले. दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गेल्या १५ दिवसांपासून पथके पाठवून रुग्ण सर्वेक्षण सुरू केले आहे. साथ वाढण्याआधीच नियंत्रणात आणली जाण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.साक्री तालुक्यातील वाघापूर, होडदाणे येथे चिकून गुनीयाचे काही रुग्ण आढळले. वाघापूर हे गाव दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नाही. तथापी डॉ़ सुधीर ठाकरे यांनी तातडीने वाघापूर येथे १५ दिवसांपूर्वी सर्वेक्षण पथक पाठवून शिबिर लावले. बाधीत काही रुग्णांवर उपचार केले. मागच्या चिकून गुनीयाचा भयंकर अनुभव लक्षात घेता अगदी सुरुवातीपासूनच नियंत्रणासाठी काळजी घेण्याची पाऊले उचलली असल्याचे डॉ ठाकरे यांनी नमूद केले. होडदाणे येथे दुसाणे केंद्राकडून लक्ष दिले जात आहे़ शुक्रवार,दि ६ एप्रिल रोजी जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ़ आऱ व्ही़ पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. बरेच रुग्ण वेहेरगाव फाटा, वाघापूर, होडदाणे येथील येत आहेत़ पण त्यात व्हायरलचे प्रमाण असून सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.निजामपूर, जैताणे येथे चिकन गुनिया सदृश रुग्ण १५ दिवसांपासून रोजगाव, उभरांढी, वाघापूर, वेहेरगाव फाटा येथील येत असल्याचे डॉ़ हेमंत पाटील, डॉ. मनीष गवळे यांनी नमूद केले. मात्र, स्थानिक असे रुग्ण नसल्याचे व यावेळी पूर्वी प्रमाणे रोगाची लक्षणेही दिसत नसल्याचे सांगण्यात आले़ आरोग्य विभागाकडून प्रभावीपणे उपाययोजना आखल्या जात आहेत़ नागरिकांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे़
साक्री तालुक्यात वेहेरगाव, होडदाणे गावांना चिकून गुनियाची शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 1:07 PM
आरोग्य विभागाकडून उपाययोजनेवर भर : नियुक्त सर्वेक्षण पथके कार्यरत
ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील चिकुन गुनिया आजाराची शंकाप्रभावी उपाययोजनेसाठी प्रशासनाची सज्जतानागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन