ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.6- नवीन शर्तीची जमिन हस्तांतरण करण्यासाठी तक्रारदारांकडून 15 हजाराची लाच घेताना साक्रीच्या नायब तहसीलदाराला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी ताब्यात घेतल़े दरम्यान, बुधवारीच शिरपूर तालुक्यात तलाठीवर झालेल्या कारवाईपाठोपाठ आता साक्रीत कारवाई झाल्यामुळे महसूल प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत़
साक्रीमधील एका तक्रारदाराने नवीन शर्तीची जमीन घेतली होती़ ती जमीन हस्तांतरण करण्यासाठीचे प्रकरण तयार करुन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले होत़े ही जमीन नावावर करण्यासाठी नायब तहसीलदार क़े डी़ मोरे यांनी तक्रारदाराकडे 15 हजाराची लाच मागितली होती़ याप्रकरणी तक्रारदाराने थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ ठरल्याप्रमाणे साक्री तहसीलदार कार्यालयात नाशिकच्या पथकाने सापळा रचला़ तक्रारदार यांच्याकडून 15 हजारांची लाच स्विकारताना नायब तहसीलदार मोरे यांना रंगेहात पकडण्यात आल़े याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आह़े