चंद्रकांत सोनारलहान वयात मॉडेलिंग करण्याची आवड होती़ त्यामुळे शिक्षणासोबतच आवड कायम मनात ठेवून जिद्द,चिकाटीच्या बळावर नाशिक येथील सौंदर्य स्पर्धेत यश मिळविले़ त्यानंतर दुबई येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्यात मी माईल्ड स्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल २०१९ फर्स्ट रनप मानकरी ठरल्याची माहिती अनन्या शिंंदे यांनी दिली़प्रश्न : मिस इंटरनॅशनल स्पर्धेतकिती स्पर्र्धक सहभागी झाले होते?उत्तर : दुबई येथील मिस ग्लोबल इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेसाठी ३८ देशातील ४७ स्पर्धक सहभागी झाले होते़ त्यात भारतासह बल्गेरिया, नेरदलॅण्ड, बोटस्वाना, अमेरिका, आॅस्टोलिया, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, ब्रिटन, फान्स व जर्मनी अशा देशाचा सहभाग होता़प्रश्न : स्पर्धेत विजयी होण्यासाठीकोणती बाब महत्वाची ठरली?उत्तर : फिलिपिन्स मध्ये पार पडलेल्या मिस अँड मिसेस ग्लोबल या सौंदर्य स्पर्धेत आॅस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, अमेरिका, सिंगापूर, फ्रान्स जर्मनीतील स्पर्धेक सहभागी झाले होते़ त्यात भारताचे प्रतिनिधी मी केले़ होते़या स्पर्धेत सौंदर्य, वक्तृत्व आणि हुशारी या तीन गोष्टीमुळे मला यश मिळविता आले़प्रश्न : सौंदर्य स्पर्धेत सहभागीघेण्यासाठी कशी मिळाली प्रेरणा?उत्तर : टिक-टॉकवर मॉडलिंग करून व्हिडीओ तयार करून छंद जोपासला त्यानतंर नाशिक येथील सौेंदर्य स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यादाच यश मिळाल्याने या क्षेत्रात करीअर करण्याची इच्छा झाली़ त्यामुळे मी या स्पर्धेपर्यत पोहचू शकली़प्रश्न : सौंदर्य स्पर्धेत करिअर करणाऱ्या तरूणींना आपण काय सांगाल ?उत्तर : या स्पर्धेत करीअर करण्यासाठी सौंदर्या जेवढे महत्वाचे आहे़ त्यासोबतचं सकारात्मक विचार, करीअर करण्याची जिद्द, सकस आहार व व्यायाम देखील महत्वाचा आहे़ तरच आपण या क्षेत्रात करीअर करू शकता़ स्पर्धेसाठी मला नंदकिशोर शेवाळे, आई मृदुला शिंंदे, दीक्षा पिसोळकर आदींचे मार्गदर्शन मिळाले़चार राऊंडमध्ये झाली स्पर्धासौंदर्य स्पर्धेसाठी चार गोष्टी अधिक महत्वाच्या ठरल्या़ त्यामध्ये जनरल नॉलेज, तुमच्या देशाचे वैशिष्टे, शारीरीक रचना तसेच ग्राऊड राऊड अशा चार राऊडमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत जॅजसची विचारलेल्या प्रशांना समाधानकारण उत्तर दिल्याने यश मिळाले़
सामोड्याची ‘अनन्या शिंदे ’ठरली सौंदर्य स्पर्धेत अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 1:34 PM
आवडीनुसार करिअर करण्याचा मार्ग शोधा
ठळक मुद्दे दुबई येथील मिस ग्लोबल इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेसाठी ३८ देशातील ४७ स्पर्धक सहभागीसौंदर्य, वक्तृत्व आणि हुशारी या तीन गोष्टीमुळे मला यश जॅजसची विचारलेल्या प्रशांना समाधानकारण उत्तर टिक-टॉकवर मॉडलिंग करून व्हिडीओ तयार करून छंद