लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : बुुुराई नदीत चिमठाणे ते परसामळपर्यंत अवैध वाळू उपसा करणाºयांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. गावकºयांनी महसूल अधिका-यांना सांगूनही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नदीतून गेल्या दोन महिन्यात लाखो ब्रास वाळू चोरी झाली असून त्यामुळे नदीत मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तहसीलदार फक्त एकटेच प्रयत्नशील दिसतात. मात्र संबंधित गावातील मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे साटेलोटे तर नाहीना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते राहुल रेखावार यांनी खुद्द बुराई नदीची पाहणी करावी व संबंधित कर्मचारी, अधिकाºयांकडून अवैध वाळू उपशाची रक्कम वसूल करून केटीवेअरच्या पाट्या दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच संबंधित बंधारे हे पाटबंधारे विभाग धुळे व जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत येतात. जर अवैध वाहतूक करणारे बंधाºयाच्या पाट्या अशाप्रकारे काढून नुकसान करत असतील तर त्यांच्यावर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.तालुक्याची जीवनदायनी म्हणून बुराई नदीकडे बघितले जाते. त्या नदीवर ६० टक्के तालुका अवलंबून आहे. सतत दुष्काळी परिस्थितीमुळे या नदीवर ठिकठिकाणी करोडो रुपये खर्चून केटीवेअर बांधण्यात आले आहेत. नुकतेच पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी यासाठी भरउन्हाळ्यात बुराई परिक्रमा केली व नदीवर नवीन ३४ बंधारे बांधले आहेत. तसेच पूर्वीचे जुने बंधारे आहेत त्यात लोखंडी फळ्या बसवल्या आहेत. नदीत चिमठाणे, निशाणे, महालपूर, दरखेडा, बाभुलदे चिरणे, कदाणे, अलाणे व परसामळ या गावातील बुराई नदीत अवैध वाळू उपसा करणाºयांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून वाहन नदीत नेण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी धरणाच्या पाट्या काढून वाहनाखाली टाकल्या जातात. त्यामुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच आतापर्यंत या दोन महिन्यात नदीची अक्षरश: चाळण करून मोठमोठी खड्डे पाडून लाखो ब्रास रेती चोरून नेत आहेत. याबाबत गावकाºयांनी पंचनामाच्या मागणीसह खुद्द जिल्हाधिकाºयांनी पाहणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर बाब महसूल कर्मचारी व अधिकारी यांच्या लक्षात आणून देखील त्यावर कारवाई झाली नसल्याने याचेच आश्चर्य नागरिकांमध्ये आहे. वास्तविक प्रत्येक गावात या भागातील तलाठी व कोतवाल हे स्थानिक असून देखील वाळू चोरटे त्यांना कसे सापडत नाहीत म्हणून चिमठाणे ते परसामळ पर्यंत स्वत: जिल्हाधिकाºयांनी पाहणी करून पंचनामा करून संबंधित त्या त्या गावातील महसूल कर्मचाºयांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या बाबत अनेकवेळा नागरिकांनी तक्रार केली तर संबंधित कर्मचारी हे वरिष्ठ अधिकारी जर तालुक्याच्या दौºयावर येतात ती माहिती रेती वाहतूक करणाºयांना पुरवून सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करण्याचे सांगितले जात असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार यांनी कोणतेही वाहन पकडण्याच्या अगोदर सदर वाहन सोडवण्यासाठी तहसीलदारावर दबाव टाकण्यात येतो तहसीलदारांनी या संबंधितांची नावे उघड करून प्रसिद्धीस देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.वाहनासाठी बंधा-याच्या पाट्यांचा रस्ता...४शासनाने करोडो रुपये खर्चून अनेक ठिकाणी केटीवेअर बंधारे बांधले आहेत. मात्र अवैध वाळू उपसा करणाºयांनी त्यांच्या वाहनाच्या चाकाखाली बंधाºयाच्या पाट्यांनी रस्ता तयार करुन वाहतूक करीत आहेत. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. धरणाला अनेक ठिकाणी पाट्या नाहीत. सदर पाट्या वाहनांच्या चाकाखाली ठेवल्याने खराब झाल्याने धरणात पाणी कसे साठवावे यासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. आमचे काही होणार नाही अशा अविर्भावात अवैध वाळू उपसा करणारे बोलतात.
बुराई नदीत वाळू तस्करांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:05 PM