साक्री तालुक्यातील कालदर हे १०० टक्के आदिवासी वस्तीचे गाव आहे. गावात सद्यस्थितीत सर्व मूलभूत व पायाभूत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावाला २००५ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात तृतीय क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. २००६-०७ या वर्षी निर्मल ग्राम पुरस्कार तर २००८-०९ या वर्षी १ लाख रुपयांचा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यात प्रथम सौर ऊर्जेचा वापर, डिजिटल शाळा सुरू करण्यात आली. ग्रा.पं. व वन हक्क समिती यांनी मिळून गावात विविध प्रजातीच्या १० हजार वृक्षांची ९६८ हेक्टरवर लागवड केली असून कुºहाडबंदी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, सांडपाण्यासाठी गटारी, पथदिवे आदी पायाभूत सोईसुविधांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. कार्यक्रम जि़प़अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता़