धुळे : देवपुरातील तुळशिराम नगर परिसरातील स्टेट बँकेच्या जवळ असलेले साडी सेंटर चोरट्याने फोडल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़ सकाळी ही बाब उजेडात आली़ २५ हजार रुपये किंमतीच्या १५० साड्या लांबविल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले़ याशिवाय ७०० ते ८०० रुपये किंमतीच्या काही साड्याही लांबविण्यात आल्याने लाखोंचा माल लंपास झाल्याचे समोर येत आहे़ देवपुरातील तुळशिराम नगर परिसरातील स्टेट बँकेच्या जवळ श्रीराम रामलाल जांगीड यांच्या मालकीचे सपना साडी सेंटर आहे़ हे दुकान चोरट्याने लक्ष्य केले़ शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केल्यानंतर श्रीराम जांगीड हे घरी गेले़ शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले़ दुकानातील गल्ला पाहिला असता त्यातून रोकड लंपास झाल्याचे व दुकानात साड्या अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ या घटनेत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील २५ हजाराची रोकडसह १५० किंमतीच्या साड्या चोरुन नेल्या आहेत़ याशिवाय ७०० ते ८०० रुपये किंमतीच्या काही साड्या लंपास झाल्याने लाखांहून अधिक किंमतीच्या साड्यांचा यात समावेश आहे़ अशी माहिती दुकान मालक श्रीराम जांगीड यांनी सांगितले़ दुसºयांदा चोरीदेवपुरातील सपना साडी सेंटरमध्ये वर्षभरात दुसºयांदा चोरीची घटना घडली आहे़ याच दुकानात दोन अज्ञात महिला साडी घेण्याच्या बहाण्याने आलेल्या होत्या़ त्यांनी दुकान मालक जांगीड यांची नजर चुकवून ५० हजार रुपये किंमतीच्या साड्या लंपास केल्या होत्या़ त्या महिलांचा अद्याप शोध लागलेला नाही़ श्रीराम जांगीड यांच्या पत्नी साड्यांना पिको आणि फॉल लावण्याचेही काम दुकानात करतात़ दिवाळी असल्याने सध्या त्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर साड्या आलेल्या होत्या़ चोरट्यांनी त्या ही लंपास केल्याचे समोर येत आहे़ परिणामी जांगीड यांना त्या साड्यांचीही नुकसान भरपाई द्यावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़
धुळ्यातील तुळशिराम नगरात साड्यांचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 10:50 PM