धुळे तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावर असणारे नगाव हे एक मोठे गाव आहे. हगणदरी मुक्तीसाठी ७५० वैयक्तिक शौचालये बांधण्यात आले आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. तपासणी, सकस आहार, लसीकरण, धुरळणी, समुपदेशन, स्वच्छता व जनजागृती केली जाते. बालसंस्कार केंद्र सुरू आहे. गावाला एक दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा होतो.वीज बचतीसाठी एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहे. के.जी.पासून पी.जी. पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. पायाभूत सोयी अंतर्गत रस्ते, गटारी, पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यात येते. ग्रामरक्षणासाठी गावात तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात आली असून ग्रामरक्षण समितीही गठीत करण्यात आली आहे. त्या द्वारे ग्रामरक्षणाबाबत वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक ते उपाय योजले जाऊन तंटामुक्ती करणे व अवैध धंद्यांना बंदी आळा बसविला जातो. महिला सक्षमीकरणांतर्गत मेळावे घेऊन महिला, युवती व बालसुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात येते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते संरपंच ज्ञानज्योती भदाणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़
सरंपच ज्ञानज्योती भदाणे यांना ग्रामरक्षण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 4:51 PM