अतुल जोशी, धुळे :सरपंचपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून रोजगार सेवकाने सरपंचावर तलवारीने हल्ला करून त्यांचा जखमी केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सरपंच भोजेसिंग अमृतसिंग राजपूत (वय ६५) हे जखमी झाले. याप्रकरणी थाळनेर पोलिस स्टेशनला संशयितावरूिद्ध गुन्हा दाखल करून, रात्री त्यास अटक करण्यात आली.
जैतपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शौचालय कामाच्या जागेची पहाणी करण्यासांी सरपंच राजपूत शिक्षक व ग्रामस्थ गेले असता, त्याठिकाणी राेजगार सेवक पितांबर अर्जुन घोडसे (वय ४६, रा. जैतपूर) याने विरोध करीत सरपंचाच्या पोटावर व हातावर तलावारीने हल्ला केला. यात सरपंच जखमी झाले. सरपंचपदाचा राजीनामा दिला नाही या कारणावरून रोजगार सेवकाने हल्ला केल्याची चर्चा आहे.
याप्रकरणी सरपंच भोजेसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पीतांबर घोडसे याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी थाळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली. संशयिताला रात्री ९.३० वाजता पोलिसांनी अटक केली आहे.