साक्री तालुक्यातील टेंभे प्र्र.वार्सा गावात ग्रा.पं.तर्फे ग्रामस्थांना मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्षेत्रात १३ जि.प. शाळा आहेत. कांदा लागवड व ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असे. त्यासाठी शिक्षकांच्या मदतीने पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ग्रा.पं. कार्यालयात त्यांचे मेळावे घेतले. ५ टक्के निधीतून सर्व जि.प.शाळांमध्ये साहित्य खरेदी करून डिजिटल वर्ग सुरू करण्यात आले. विजेची अडचण लक्षात घेऊन सौर ऊर्जा पॅनल घेऊन बसविण्यात आले. विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यासाठी ग्रा.पं.मार्फत सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध, वक्तृत्व स्पर्धांसह संगीत कार्यक्रम घेण्यात येतात. अभ्यासिका चालविण्यात येते. विविध शैक्षणिक साहित्याने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. शाळा परिसरांमध्ये स्वच्छतेसह दुरुस्तीवर भर दिला. त्यामुळे शाळांमध्ये उपस्थिती वाढली. कार्यक्रमात केद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़सुभाष भामरे यांच्या हस्ते सरंपच शशिकांत राऊत यांना हा पुरस्कार देण्यात आला़
सरंपच शशिकांत राऊतांना शैक्षणिक सुविधा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 5:00 PM