लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये, धुळे शहरातील बाळापूर, धुळे तालुक्यातील नेर व फागणे, शिंदखेडा तालुल्यातील दोंडाईचा व साक्री तालुक्यातील निजामपूर येथील रुग्णांचा समावेश आहे.शनिवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ८७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील १२, शिंदखेडा तालुक्यातील १३, शिरपूर तालुक्यातील ६७ व साक्री तालुक्यातील १० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ८ हजार १७० इतकी झाली आहे.
शनिवारी १८९ अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 9:42 PM