लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शनिवारी आणखी २१० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये, धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील दोन, साक्री रोड परिसरातील दोन व श्रीरामनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.शनिवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ८२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २७, शिंदखेडा तालुक्यातील ५९, शिरपूर तालुक्यातील ४० व साक्री तालुक्यातील दोन रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ७२७ इतकी झाली आहे.
शनिवारी २१० अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 5:12 PM