बळसाणे : चौदाव्या वित्त आयोगातून बळसाणे येथील सरपंच दरबारसिंग गिरासे व पदाधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असणाºया वस्तू भेट देत शाळेचे ऋण फेडल्याचे सांगितले. याशिवाय ग्रामस्थांसाठी शवपेटीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रिकेट संच, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, कॅरम, लेझीम व उत्कृष्ट प्रकारचे साऊंड सिस्टिम त्याचप्रमाणे अंगणवाडीकरिता टेबल कपाट, खुर्ची आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यसाठी स्पर्धा परिक्षांची पुस्तक अभ्यासासाठी वाचनालयात उपलब्ध करुन दिली आहेत. वाचनालयात स्पेशल डेस्क खुर्ची, कपाट, विविध लेखकांची पुस्तकं, कादंबरी, असे विविध पुस्तक वाचकांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत़ तसेच गावासाठी शवपेटीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी सरपंच दरबरसिंग गिरासे, उपसरपंच मीराबाई सुदाम खांडेकर, शालेय समिती अध्यक्ष दत्तू धनुरे, सदस्य महावीर जैन, ध्यानाबाई माळचे, मालिखा पठाण, देविदास धनुरे, इंद्रसिंग गिरासे, जितेंद्र ईशी, लक्ष्मण मासूळे, अवचित धनगर, युवराज चव्हाण, भूषण हालोरे, महादू हालोरे, शायसिंग मोरे, के. यु. सूर्यवंशी, मुख्याध्यापक हंसराज भामरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर काकूस्ते यांनी केले.सरपंच गिरासे यांनी सांगितले की, मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची संधी उपलब्ध झाल्याचे समाधान आहे़ हा माझ्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे़ विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवात सहभाग घेऊन सुवर्णपदक पटकावित बळसाणे गावासह शाळेचे नाव कसे उज्ज्वल करावे़ अभ्यासकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
बळसाणेच्या सरपंचांनी फेडले शाळेचे ऋण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 12:25 PM