लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्याने, राज्यात त्याचा गौरव झालेला आहे. मात्र या डिजिटल शाळांमधील तब्बल १९८ वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीमुळे हे वास्तव समोर आले आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन, या शाळा खोल्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ४ हजार १०७ वर्ग खोल्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून थोडे थोडके नव्हे तर तब्बल ९० हजार ९८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी शाळांच्या वर्ग खोल्या धोकादायक झालेल्या आहेत. काही शाळांचे छत धोकेदायक झालेले आहे, काही शाळांच्या वर्ग खोल्या गळक्या आहेत, तुटलेल्या आहेत. शिक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या जिल्ह्यातील १९८ वर्ग खोल्या जीर्ण झाल्याचा अहवाल मांडला हाता. या खोल्या दुरुस्तीची गरज असल्याचे अहवालात नमूद केले होते.यात धुळे तालुक्यात ५५, साक्री तालुक्यात ६६, शिंदखेडा तालुक्यात १७ तर शिरपूर तालुक्यातील ६० वर्ग खोल्यांचा समावेश आहे.शाळा डिजिटल करणे काळाजी गरज आहे. मात्र त्याचबरोबर शाळा इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सध्या धोकेदायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी लाखोचा निधी लागतो. त्यामुळे शाळा डिजिटलबरोबरच जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांची दुरुस्तीही महत्त्वाची असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या सूचनाकडे दुर्लक्षया जीर्ण वर्ग खोल्यांबाबत संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींनी तक्रारी करूनही अद्याप त्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेले नसल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यात शाळा डिजीटल, वर्गखोल्या मात्र धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:30 AM
विद्यार्थी जीव मुठीत घेऊनच गिरवतायेत ज्ञानाचे धडे
ठळक मुद्देजिल्ह्यात ११०३ जि.प. शाळा१९८ वर्ग खोल्या धोकेदायकग्रामपंचायतीच्या सूचनेकडे दुर्लक्ष