शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चुरशीच्या सामन्यात़़़ विजयावर शिक्कामोर्तब़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:34 PM

धुळे : निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी केंद्राबाहेर केली होती गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त

धुळे : विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्याकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणुक सुरुवातीपासून चुरशीची ठरली होती़ निकालानंतर चुरस संपली असलीतरी विजयावर दुपारी उशिराने प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला़विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते़ धुळ्यात चुरशीची ठरलेल्या निवडणुकीत सर्वांना मागे टाकत एमआयएमचे फारुक शाह यांनी बाजी मारली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला़ तर धुळे ग्रामीण मधून काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांनी बाजी मारली़ त्यांनी भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांचा पराभव केला़ तसेच साक्री मतदार संघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी आघाडी घेत विजय संपादन केला़ शिरपूरमध्ये मात्र अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काशिराम पावरा यांनी आपला ठसा पुन्हा एकदा उमटविला़ त्यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्यामुळे याकडे देखील तालुक्याचे लक्ष लागून होते़ तर शिंदखेड्यात मात्र विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांनी मतांची आघाडी घेत आपला विजय नोंदविला़ विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता़निमगुळ येथे कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, आनंदोत्सवनिमगूळ : येथे जयकुमार रावल विजयी झाल्याबद्दल गावातील सर्व कार्यकर्त्यांनी गाव दरवाज्याजवळ एकत्र येऊन गुलालाचा वर्षाव केली आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद लुटला़ याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती रघुवीर बागल, डॉ़ विरेंद्र बागल, हर्षवर्धन बागल, माजी उपसरपंच दीपक बागल, प्रा़ वसंत बागल, एस़ आऱ बागल, नंदलाल बागल, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री बागल, प्रकाश सोनवणे, राजेंद्र साळवे, महेंद्र बाविस्कर, सागर बाविस्कर, अमोल मधुकर बागल आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले़ याप्रसंगी गावातील अबालवृद्धांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़आमदारांच्या समर्थकांना पोलिसांनी अडविले..विजय झाल्याचे समजताच आमदार कुणाल पाटील मतमोजणी केंद्राजवळ आले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. सर्वांना अभिवादन करून कुणाल पाटील मतमोजणी केंद्राकडे निघाले. त्यांच्यामागे समर्थकही जाऊ लागले. मात्र पोलिसांनी या समर्थकांना केंद्रात जाण्यास मज्जाव केला. आपल्या समर्थकांना रोखल्याचे बघून आमदार कुणाल पाटील माघारी फिरले. तापर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी वरिष्ठांशी फोनवर चर्चा करून दोन समर्थकांना जाऊ द्यायचे का? अशी परवानगी वरिष्ठाकडे मागितली. त्याला होकार मिळताच दोन समर्थक कुणाल पाटील यांच्या समवेत आत गेले.आमदार कुणाल पाटील यांच्या समर्थकांचा जल्लोषधुळे ग्रामीण मतदार संघात पाच उमेदवारांमध्ये लढत असली तरी खरा सामना कॉँग्रेसचे कुणाल रोहीदास पाटील व भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांच्यात होता. पहिल्याच फेरीत ज्ञानज्योती भदाणे यांनी ४५० मतांची आघाडी घेतली. मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांना ही आघाडी टिकविता आली नाही. आठव्या फेरी अखेर त्यांनी ८४ मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र कुणाल पाटील यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये मतांचा मोठा पल्ला गाठला. कुणाल पाटील विजयी होत असल्याचे बघून समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. अनेकांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन विजयोत्सव साजरा केला. दुपारी २ वाजेच्या सुमारास आमदार कुणाल पाटील यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Dhuleधुळे