अतुल जोशी ।आॅनलाइन लोकमतधुळे : एस.टी.ची नोकरी म्हटली म्हणजे वेळेचे बंधन नसते...बसमध्ये अनेक प्रकारचे प्रवासी भेटत असतात. घरची जबाबदारी सांभाळून वाहकाची नोकरी करणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. परंतु सर्व परिस्थितीला तोंड देत महिला वाहक हिंमतीने या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे धुळे आगाराच्या निलीमा गोपाल नेतकर (उंदिरखेडा,ता. पारोळा) या होत.निलिमा नेतकर यांना नोकरी करायचीच होती. कोणत क्षेत्र मात्र ते निश्चित केलेले नव्हते. असे असले तरी सुरवातीपासूनच त्यांनाही ‘खाकी’ वर्दीचे आकर्षण होते. अशातच १२वीत असतांना एस.टी. महामंडळाच्या जागा निघाल्या. प्रयत्न म्हणून त्यांनी फॉर्म भरला. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नातच त्यांना ‘खाकी वर्दी’ची नोकरी मिळाली. पहिल्या प्रयत्नातच तेही ज्याचे आकर्षण होते तीच नोकरी मिळाल्याने, त्यांना व परिवाराला अत्यानंद झाला.गेल्या नऊ वर्षांपासून त्या महिला वाहक म्हणून काम करीत आहेत. महिला वाहकाची नोकरी करायची म्हणजे अनेक गोष्टींना तोंड देण्याची हिंमत पाहिजे. कारण या नोकरीत वेळेचे बंधन नसते. रस्त्यात उद्भवलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावे लागते. शिवाय गाडीत नाना तºहेचे प्रवासी भेटत असतात. या या सर्व प्रसंगांना सामोरे जावे लागते. हे करत असताना वेगवेगळे अनुभवदेखील येत असतात.घर, स्वत:चा प्रवास यासर्व गोष्टीकडे लक्ष देऊन वाहकाची नोकरी करणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. मात्र कंटाळा करून चालणार नाही. हे क्षेत्र निवडले आहे, तर त्याला न्याय द्यावाच लागतो.सणाच्या दिवशीसुटी नसते याची खंत वाटतेरक्षाबंधन, दसरा, दिवाळी यासारखे सण नागरिक कुटुंबासह साजरा करतात, सणांचा आनंद लुटत असतात. आम्हाला मात्र हे सर्व सोडून ‘ड्युटी’ला प्राधान्य द्यावे लागत असते. सणाच्या दिवशी सुटी नसते याची थोडी खंतही वाटत असते.
‘खाकी वर्दी’च्या आकर्षणामुळेच निवडले क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:28 AM
महिला वाहक निलिमा नेतकर: नोकरी करतांना करावी लागते तारेवरची कसरत
ठळक मुद्देपहिल्याच प्रयत्नात मिळाली नोकरीकुटुंबाला झाला आनंदसणाच्या दिवशी सुटी असावी,अशी अपेक्षा