धुळे : बोरकुंड ता़ धुळे येथील ईंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरकुंड व रतनपुरा गटातील २१ गावांमध्ये महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य व कृषी या विषयांवर काम करण्यासाठी व शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ईंदूबाई भदाणे प्रतिष्ठान ग्रामविकास फेलोशिप देण्यात आली.ग्रामीण भागात सक्षमीकरणाचे काम करण्यासाठी गोविंदा साळुंखे व राजश्री पाटील यांची र्इंदुबाई भदाणे प्रतिष्ठाणच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे़ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रांताधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले़ईंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व सचिव शालीनी भदाणे यांच्यासह तज्ज्ञ मार्गदर्शकांनी फेलोशिप उपक्रमासाठी योगदान दिले. यावेळी फेलोशिप समन्वयक संदीप देवरे उपस्थित होते.फेलोशिपसाठी निवड झालेले हे दोन्ही अभ्यासक ग्रामीण भागातील विविध प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करुन या समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण जनता आणि प्रशासनात दुवा निर्माण करणार आहेत़ अभ्यासाअंती काही उपाययोजना देखील सुचविणार आहेत़ शासनाच्या विविध योजनांची जनजागृती केल्यामुळे या योजनांचा लाभ घेणे ग्रामस्थांना सोपे जाणार आहे़प्रशासनाने केले कार्याचे कौतुकयावेळी प्रांताधिकारी म्हणाले, ईंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरकुंड गावात अनेक विकास कामे झालेली आहेत़ संपुर्ण परिसरात अशा प्रकारची विकासकामे करण्यासाठी, ग्रामीण समस्यांचा अभ्यास करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ग्रामविकास फेलोशिपचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील प्रश्न व समस्यांना नीट समजुन घेतले आणि अभ्यासपुर्ण माहीती गोळा केली तर गावांमध्ये विकासकामे करणे सोपे जाते.अजुनही आहेत अनेक समस्याशासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचत नसल्याने किंवा ग्रामस्थांना योजनांची माहिती मिळत नसल्याने ग्रामीण भागामध्ये अजुनही अनेक समस्या आहेत़ काही स्वयंसेवी संस्था त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत़ या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात जनजागृती होत आहे़ शासनाच्या योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत़ त्यातून विकास होत आहे़
ग्रामविकास फेलोशिपसाठी दोघांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 9:55 PM