शिरपूर : मोहाली (पंजाब) येथे होणाºया राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी येथील सुरज हिरामण शिरसाठ व राज भगवान पाटील या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे़१२ ते १८ डिसेंबर २०१८ रोजी मोहाली येथे होणाºया ज्युनिअर मेन राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे खेळाडू सुरज हिरामण शिरसाठ याची ७५-८० वजन गटात तर राज भगवान पाटील याची ४६-४८ वजन गटात निवड झाली. चंद्रपूर येथे महाराष्ट्र बॉक्सिंग संघाच्या निवड चाचणीत यांची महाराष्ट्र बॉक्सिंग संघात निवड करण्यात आली होती.सुरज शिरसाठ याने गेल्या महिन्यातच मुंबई धारावी येथे झालेल्या ७५-८० वजन गटात शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले़ तसेच गुवाहाटी-आसाम येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतही यशस्वी सहभाग नोंदविला आहे़राज भगवान पाटील याने चंद्रपुर येथे महाराष्ट्र बॉक्सिंग संघाच्या निवड चाचणीत सुवर्ण पदक घेऊन मोहाली पंजाब येथे होणाºया राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली़ यापूर्वी त्याने नागपुर येथे झालेल्या राज्य बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण, कोल्हापुर राज्य बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण, दमण येथे झालेल्या वेस्टझोन स्पर्धेत सुवर्ण, आॅल इंडिया ईटर साई स्पर्धेत रोहटक पंजाब येथे सुवर्ण पदके पटकाविली आहेत़ त्याने आतापर्यंत अनेक सुवर्णपदकांची कमाई केली आहे़ देशाला आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देण्याचे त्याचे स्वप्न आहे़ त्या पध्दतीने तो तयारीला लागला आहे़या दोन्ही खेळाडूंच्या निवडीबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, राहुल रंधे, रोहित रंधे, राजेंद्र बोरसे, क्रीडा संचालक एल.के. प्रताळे, प्रा.राधेश्याम पाटील, विजेंद्र जाधव, अमोल शिरसाठ, धीरज पाटील, भरत कोळी, नूर तेली, मनोज चौधरी, धुळे बॉक्सिंग संघटनेचे महासचिव मयूर बोरसे यांनी कौतुक केले़
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:49 PM