लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील आर.सी.पटेल इस्टिट्यूट आॅफ फार्मसी एज्युकेशन व कवियत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यर्थिनींसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस विद्यापीठाच्या युवतीसभा अंतर्गत विद्यार्थी विकास मंच यांचे अनुदान प्राप्त झाले होते.कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एच.एम. शेख यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी डीवायएसपी संदीप गावीत, प्राचार्य डॉ.संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेड़कर, महिला मंच प्रमुख डॉ.पद्मजा आगरकर, समन्वयिका डॉ.योगिता अग्रवाल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.अनिल टाटीया, प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे आदी उपस्थित होते़ कार्यशाळेत ७५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला़ याप्रसंगी स्वयंसिद्धा नाशिक विभागाचे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, राज्य स्वयंसिध्दा नियंत्रक प्राजक्ता सोनवणे, दीपक शिरसाठ, सूर्यकांत अहिरे, जयराज भारुडे यांनी प्रशिक्षणात आत्मविश्वासाने स्वत:चे संरक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले़ तसेच आपल्याजवळील वस्तूंचा जसे पर्स, पाण्याची बाटली, ओढणी, हेअर पिन यांचा उपयोग करून स्वत:चा बचाव कसा करावा याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रा.एच.एम.शेख यांनी कार्यशाळे दरम्यान महाविद्यालयास भेट देऊन कार्यशाळेतील विदयार्थीनींचे प्रात्यक्षिके बघितले. सहभागी विद्यार्थिनींना प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. विद्यार्थिनींनी आत्मविश्वास वाढून न घाबरता अचानक येणाºया संकटाचा कोणत्याही सामना करू शकतो असे त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, प्राचार्य डॉ. एस.जे.सुराणा व उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांचे अनमोल सहकार्य लाभले़ सुत्रसंचालन प्रा़स्रेहल भावसार यांनी केले़.
विद्यार्थीनींना मिळाले स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 5:56 PM