शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

जामनेर पुरवठा कार्यालयात रंगलेल्या ओली पार्टीमुळे खळबळ

By admin | Published: February 18, 2015 11:54 PM

महाशिवरात्रीच्या दिवशीच तळीरामांनी कार्यालयातच रिचवली दारु

महाशिवरात्रीच्या दिवशीच तळीरामांनी कार्यालयातच रिचवली दारुजामनेर : ज्या तहसिल कार्यालयाला विनंत्या आर्जव करुन तालुक्यातील ३० ते ४० गावांच्या महिलांनी, पुरुषांनी संपूर्ण दारुबंदीची मागणी वेळोवेळी केली, त्याच कार्यालयातील पुरवठा विभागात सकाळी, सकाळी चक्क रम, व्हिस्कीच्या बाटल्या सापडून आल्या. विशेष म्हणजे ज्या रात्री हा मद्यसेवनाचा प्रकार झाला असेल त्यादिवशी तर महाशिवरात्र हा उपवासाचा दिवस होता. त्याचमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तहसील कर्मचार्‍यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज (१८) सकाळी पुरवठा कार्यालयातील कर्मचारी नेहमीप्रमाणे साफसफाई करण्यासाठी कार्यालयात गेला. तेथे टेबलावर बिसलेरी पाण्याच्या खाली बाटल्या, चखण्यासाठीचे पदार्थ आदी रम आणि व्हिस्किच्या दहा-बारा बाटल्या मिळून आल्या. या घडलेल्या प्रकाराची कार्यालयीन आवारात चर्चा सुरू झाली.कार्यालयाच्या चाव्या चार जणांकडे...पुरवठा विभागाच्या कार्यालयाच्या चाव्या चक्क दोन नाही तर चार जणांकडे असल्याचे सांगण्यात आले. एवढे महत्त्वपूर्ण कार्यालयाच्या चाव्या एक दोन माणसांऐवजी चार ते पाच जणांकडे कशासाठी ठेवण्यात आल्या याचेही आ›र्य होत आहे. कारण पुरवठा विभागाच्या कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे असता, त्याचवेळी आता नवीन कार्ड बनविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याशिवाय स्वस्त धान्य दुकानदारांसंबंधीचा अहवाल, त्याविषयीचे कागदपत्रे आदी अनेक महत्त्वपूर्ण अशी शासकीय आणि सार्वजनिक मालमत्ता याच कार्यालयात असून काही विपरीत घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार ही सुद्धा प्रश्न आता शहरवासीय विचारू लागले आहेत. यापूर्वीही तहसील आवारात बिअर आणि दारूच्या बाटल्या मिळून आल्या होत्या तेव्हा कसे तरी प्रकरण मिटविण्यात आले. आज पून्हा महाशिवरात्री या पवित्र दिवशीच्या रात्रीच तळीरामांनी मोठ्या प्रमाणात मद्य रिचवून आपली भूक आणि उपवासाला वाट मोकळी करुन दिली असावी असेही उपहासात्मक शहरात चर्चा सुरू आहे.- माझ्या कानावर घटनेची माहिती आली आहे, सुटीचा दिवस असल्याने आर.एस.माळी पुरवठा निरिक्षक........काही कर्मचारी रात्री काम करत होते. कोण अधिकारी, कर्मचारी वा स्वस्त धान्य दुकानदार पण त्यांनी काही केल्याचे म्हटले आहे. यामध्ये सामील होता याची माहिती व चौकशी सुरू आहे, या प्रकारात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर आणि कर्मचारी अधिनियमनाखाली कडक कारवाई करण्यात येईल. -चंद्रकांत देवगुणे, तहसीलदार जामनेर.कॅप्शन...जामनेर- तहसील आवारातील पुरवठा विभागाच्या कार्यालयात साफसफाई करताना मिळालेल्या दारूच्या बाटल्या.