धुळे : कापसाच्या व्यापाºयाचे ७ लाख ९ हजार रुपये नोकराकडे सोपवून ते धुळे तालुक्यातील शिरुड येथे पोहचविण्यासाठी विश्वासाने व्यापाºयाने आपल्या नोकराकडे दिले. पण, पैसे सांगितलेल्या ठिकाणी न पोहचवता परस्पर घेवून नोकराने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.धुळे तालुक्यातील शिरुड येथील उमेश अशोक कोठावदे (४२) हे कपाशीचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे पंकज धनराज बोरसे नावाचा विश्वासू नोकर अर्थात कर्मचारी कार्यरत आहे. कपाशी विक्री झाल्यानंतर आलेले ७ लाख ९ हजार रुपये त्याच्याकडे सोपविण्यात आलेले होते. हे पैसे धुळे तालुक्यातील शिरुड येथे पोहच करण्याची जबाबदारी देण्यात आल्यानंतर व्यापारी कोठावदे हे दुसºया अन्य कामांत व्यक्त झाले. ७ लाख ९ हजार इतकी मोठी रक्कम आपल्या हातात आल्याने पंकज बोरसे याची नियत फिरली. तो ही रक्कम घेऊन शिरुड येथे न जाता कुठेतरी फरार झालेला आहे. ही घटना २५ डिसेंबर सायंकाळी ७ ते २६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. पैसे दिल्यानंतर वेळेत पंकज न आल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता, पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आपले ७ लाख रुपये घेवून तो फरार झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी उमेश अशोक कोठावदे यांनी धुळे तालुका पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती कथन केली. आपले ७ लाख ९ हजार रुपये घेवून आपलाच नोकर पळून गेल्याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित पंकज धनराज बोरसे (रा. शिरुड ता. धुळे) याच्या विरोधात भादंवि कलम ४०८ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे घटनेचा तपास करीत आहेत.
नोकराने लावला व्यापाऱ्याला चूना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 9:59 PM