आॅनलाइन लोकमतधुळे : येथे शुक्रवारी दुपारी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे चौथे त्रैवार्षिक अधिवेशन झाले. यात शाळांचे वीजबिल १४ व्या वित्त आयोगातून भरण्यात यावा यासह चार ठराव पारीत करण्यात आले.अधिवेशनाच्या अध्यक्षपदी राज्याध्यक्ष उदय शिंदे होते.व्यासपीठावर शिक्षक नेते शिवाजी साकरे, राज्यनेते आबा शिंपी, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी होते.यावेळी बोलतांना उदय शिंदे म्हणाले, संघर्ष करणे हा शिक्षक समितीचा आत्मा आहे. शिक्षकांचे अजुनही अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी शिक्षक समिती नेहमीत प्रयत्नशील आहे. गुजरातच्या धर्तीवर राज्यात जेव्हा शिक्षक सेवकाची सुरूवात झाली, त्यास सर्व प्रथम शिक्षक समितीनेच विरोध केला होता.नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी ही समितीची अनेक वर्षांची मागणी असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थकीत बिलामुळे शाळांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येतो. काही जिल्हा परिषदांनी १४ व्या वित्त आयोगातून हे बिल भरण्यास मंजुरी दिली आहे. मात्र ग्रामविकास विभागानेच त्यासंदर्भात पत्र काढले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र पाटील व सरचिटणीसपदी बापू पारधी यांनी फेर निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी मनोज निकम यांची निवड करण्यात आली.प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन बापू पारधी यांनी केले. अधिवेशनाला जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:35 AM
विविध विषयांवर झाली चर्चा
ठळक मुद्देअधिवेशनात चार ठराव पारीतसमितीच्य जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवडअधिवेशनाला जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित