धुळे- शनिवारी आणखी सात रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. वायपूर येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. धुळे शहरातील मिल्लत नगर येथे एक व शिरपूर येथील एकी रूग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच अज्ञात परप्रांतीय मजूराचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीचेही रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. दोन दिवसात तब्बल २८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या १०8 वर पोहोचली आहे. शुक्रवारी २१ रूग्ण पॉजीटीव्ह आढळले होते. धुळे शहरातील १५ रूग्ण आढळले होते तर शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील २९ वर्षीय महिला व ३६ वर्षीय पुरूष कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. तसेच साक्री तालुक्यातील बल्हाणे येथे आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली. याआधी बल्हाणे येथील वृद्ध दांपत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर हिरे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच धुळे तालुक्यातील शिरूड येथील ३९ वर्षीय पुरूष तसेच शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धुळे शहरातील बाधीत आढळलेल्या रूग्णामध्ये टपाल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
शनिवारी सात पॉझिटीव्ह रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 4:59 PM