लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरात भारतरत्न डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक जनआंदोलनातर्फे शाहीरी जलसा व प्रबोधनात्मक नृत्यकलेचा कार्यक्रम घेण्यात आला़१३ रोजी संध्याकाळी येथील खालचे गावात शाहीरी जलसाचा कार्यक्रम पार पडला़ सुरूवातीला डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ यावेळी नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी अमोल बागुल, सिद्धार्थ जगदेव (धुळे), सत्यशोधक जनआंदोलनचे जिल्हाध्यक्ष दत्तू थोरात, नगरसेवक पिंटू शिरसाठ, गणेश सावळे, बापू थोरात, महेंद्रसिंग परदेशी, गोपाल पाटील, बापू इंदासे, बापू सोनवणे, श्रीराम सोनवणे, किसन वडार, संजीव थोरात, ब्रिजेश थोरात, पी.वाय. शिरसाठ, बी.व्ही. मोरे, जी.के. मंगळे, अनिल आखाडे, जिजाबराव कुवर, बाबू खैरनार, राजू खैरनार आदी उपस्थित होते़सत्यशोधक जनआंदोलन आयोजित ‘जागर-२०१९’ निमित्ताने कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली. शाहीरी जलसाचे सादरीकरण विजय अहिरे यांनी ‘संविधान बोल रहा है, मैं खतरे में हुँ’ या शायरीने केले. शाहीर प्रवीण पाटील, शाहीर मनोज नगराळे, विजय वाघ, सिद्धांत बागुल, राकेश अहिरे, राहुल बच्छाव व क्रांती पानपाटील यांनी शाहिरी जलसाचे सादरीकरण केले़ सत्यशोधक शिक्षक सभेतर्फे वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, प्रबोधनपर सामान्यज्ञान स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत- प्रथम गौरी भटू थोरात, द्वितीय मयुरी महेंद्र करंकाळ, तृतीय क्रमांक प्रिया रमेश संैदाणे, सामान्यज्ञान प्रबोधन परीक्षा- मयुरी महिंद्र करंकाळ, सिद्धार्थ सुनील थोरात, अभिजित रवींद्र वाघ तर मोठ्या गटात- साक्षी नाना बैसाने, कविता राजू थोरात, कुणाल अशोक सोनवणे, रंगभरण स्पर्धेत- देवयानी रमेश शिरसाठ, स्वाती यशवंत सावळे, संजना अशोक खैरनार, रांगोळी स्पर्धेत- दिपाली संजय थोरात, दीक्षा अनिल खैरनार, पुनम अरुण बाविस्कर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.शाहीरी जलसा कार्यक्रमात राजमाता जिजाऊंची वेशभूषा तुलसी गोपाल कापडे, सावित्रीबाई फुलेंची निकिता सुनील पाटील, रमाई आंबेडकरांची वेशभूषा योगाक्षी राहुलसिंग परदेशी या विद्यार्थिनींनी केली. शाहिरी जलसा व समुहनृत्याचे सुत्रसंचालन राजीव हाके व ज्वाला मोरे यांनी केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यशोधक शिक्षक संघटनेचे सुनील बैसाणे, योगेश पवार, राहुल थोरात, सतिष खैरनार, देवानंद थोरात, सुनील थोरात, दिपक अहिरे, महेंद्र करंकाळ, रावसाहेब अहिरे, कचरू अहिरे, अनिल थोरात, राजेश सावळे, आकाश सोनार, दिपक खैरनार, अनिल खैरनार, दादा पाटोळे, श्रावण पाटोळे, बाळा पवार, गौतम अहिरे, शुभम मोरे, संदिप वानखेडे यांनी परिश्रम घेतले़ यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.