राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी रविवारी धुळ्यात दिलेल्या आपल्या ९ मिनिटाच्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस व राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि आमदारांना एकत्र येण्याचा कानमंत्र दिला. त्यामुळे आगामी मनपा आणि जि.प., पं.स. निवडणूक काँग्रेस - राष्टÑवादी एकत्र लढतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता आनंदीत झाला आहे. काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी स्थापनेसंदर्भात ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले.महापालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पाच वर्षानंतर खासदार शरद पवार हे धुळ्यात आले. त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे यांच्यासह काँग्रेस - राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष, धुळे महानगर अध्यक्ष बºयाच दिवसानंतर एकाच व्यासपीठावर दिसले. गेल्या महापालिका आणि जि.प. निवडणुकीत शिंदखेडा तालुका वगळता काँग्रेस आणि राष्टÑवादी एकमेकाच्या विरोधात उभे होते. यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळेपेक्षा परिस्थिती वेगळी आहे. महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. परंतु पाच वर्षात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर मंगळवारी राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्टÑवादी अडचणीत आले आहे. राष्टÑवादीला यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपात गेलेल्या नगरसेवकाच्या जागी किंवा त्यांच्यासमोर त्याच तुल्यबळाचे उमेदवार उभे करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत, हद्दवाढीत महानगरात समाविष्ट झालेल्या गावांच्या जागा आणि मुस्लिम बहुल भागात ज्याठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे, त्या जागा काँग्रेसला दिल्यातर दोघांना त्याचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसची शहरात परिस्थिती काय हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे काँग्रेसला राष्टÑवादीची साथ मिळाली तर चांगला रिझल्ट मिळू शकतो, हे दोन्ही पक्ष जाणतात. जिल्हा परिषदेतसुद्धा मताची विभागणी आणि ग्रामीण भागात भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेस - राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे सर्व नेते जाणून आहे.राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि आमदारांनी आवर्जून उपस्थिती देऊन आघाडीस एकप्रकारे संमती दर्शविली आहे. तर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आगामी दोन्ही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढवतील, अशी ग्वाही आपल्या भाषणातून दिली. हाच धाग पकडून मनपा आणि जि.प.चे निकाल चांगले लागले तर येणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा मिळेल. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. त्यामुळे शहर, जिल्ह्याचा आणि पुढे राज्याचाही विकास होईल, असा कानमंत्र खासदार शरद पवार यांनी आपल्या शैलीत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना दिला. आपल्या भाषणातून त्यांनी आगामी दोन्ही निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढतील, हे सर्वांना स्पष्ट करुन दिले आहे. त्यांचा हा निर्णय दोन्ही पक्षांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
शरद पवार यांनी नेत्यांना दिला ‘एकी’चा कानमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:49 PM
जि.प, पं.स. आणि महापालिका निवडणूक : काँग्रेस - राष्टÑवादीची आघाडी स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब
ठळक मुद्देखासदार शरद पवार यांनी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले. त्याला उपस्थित सर्वच नेतेमंडळींनी होकारही दिला. महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीने लढविली जाईल, हे ही निश्चित झाल्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंदहपरंतू पक्षातील गटा-तटाच्या राजकारणाचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. कारण या गटा-तटाच्या राजकारणामुळे पक्षातील भल्या - भल्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या पाडापाडीच्या राजकारणाचा फटका दोन्ही पक्षांना अनेकदा बसला आहे.त्यामुळे आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी शरद पवारांनी आवाहन केल्याप्रमाणे गट-तट विसरुन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, अशी प्रामाणिक अपेक्षा सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.