अर्थे : शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील एसआरपीएफ जवानाची पत्नी व मुलीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जवानाची पत्नी अर्थे खुर्द व अर्थे बुद्रुक येथील ११ कुटुंबाच्या संपर्कात आली होती. तसेच बाजारातही खरेदीला गेली होती, डॉक्टरांकडे तपासणीला गेली होती. ती घरात सासू-सासऱ्यांच्याही संपर्कात होती.त्यामुळे कोरोनाची भीती अधिक वाढलेली आहे. आरोग्य यंत्रणेने तिच्या सासु सासऱ्यांचीही तपासणी करणे गरजेचे होते.मात्र आरोग्य यंत्रणेने काहीच हालचाल केली नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान जवानाची पत्नी व मुलगी पॉझिटिव्ह असल्याची समजताच गावात खळबळ उडाली आहे़ तर अर्थ गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू होती़
ती महिला ११ कुटुंबाच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:26 PM