लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून आपल्या शेतात कोथिंबीर पीक घेतले. मात्र, बाजारात कोथिंबीरला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कोथिंबीर काढून बाजारात विक्रीसाठी नेण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर कोथिंबीरच्या शेतात मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.गेल्या वर्षी कोथिंबीरला चांगला भाव मिळाला होता. काही परप्रांतीय व्यापारी देखील खरेदीसाठी आले होते. त्यामुळे असंख्य शेतकºयांनी शेतात कोथिंबीर पीक घेतले. मात्र, यंदा मुबलक प्रमाणात कोथिंबीर पीक आल्याने बाजारात कवडीमोल भावात कोथिंबीर विक्री करावी लागत आहे. त्यात परप्रांतीय व्यापाºयांनी गावाकडे पाठ फिरवली आहे. शेतातून कोथिंबीर पीक काढून बाजारात नेण्याचा खर्च देखील निघत नसल्याने हे पीक सोडून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.यावर्षी पाऊस चांगला झाल्याने मेंढपाळांना कपाशीचे पीक मुबलक आहे. त्यातच मोफत कोथिंबीरचे शेत मिळाल्याने ते आनंदी आहेत. मात्र, दुसरीकडे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे.कोथिंबीर पिकासाठी बियाणे पाच हजार रुपये, मजुरी तीन हजार रुपये असा आठ हजाराचा खर्च झाला आहे. मात्र, बाजारात कवडीमोल भाव मिळत असून त्यात लागवड खर्च तर दूरच बाजारात पिक नेण्यासाठीचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
शेतात सोडल्या मेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:04 PM