ठळक मुद्देशिंदखेडा स्टेट बँकेत शिक्षकांनी मांडला ठिय्यातब्बल ६ तासानंतर पगार मिळाल्याने आंदोलनाचा समारोप
लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील एज्युकेशन संस्थेचे एमएचएसएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, गल्स स्कूल शिंदखेडा येथील शिक्षकांनी स्टेट बँकेच्या शाखेतच पगारासाठी ६ तास ठिय्या मांडला़ सायंकाळी त्यांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्यानंतर ठिय्या आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ शिक्षकांचे वेतन स्टेट बँकेच्या शिंदखेडा शाखेतून होत असते़ गेल्या दोन महिन्यांपासून बँक व्यवस्थापकाच्या आडमुठे धोरणामुळे शिक्षक पगारापासून वंचित होते़ शनिवारी अचानक शिक्षकांनी एकत्र येऊन बँकेतच पगारासाठी ठिय्या मांडला होता़ हे आंदोलन सायंकाळपर्यंत सुरुच होते़ तब्बल सहा तास आंदोलन केल्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर पगाराचे पैसे आल्यामुळे शिक्षकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले़