श्याम सोनवणे, लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या एक हजार बसेस लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा प्रचार करणार आहेत. एसटी बसेसवर जाहिरात करण्यास परवानगी देण्यात आली असून, शिंदेसेनेने त्यासाठीचे हक्क प्राप्त केले आहेत. शिंदेसेनेच्या व्यतिरिक्त इतर कुणाच्याही जाहिराती परवानाधारक अथवा इतरांमार्फत प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे अतितातडीचे परिपत्रक राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना महामंडळाच्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी पाठविले आहे.
प्रचारासाठी आपण ज्या पद्धतीने भाडेकराराने खासगी वाहने लावताे, तशाच भाडेकराराने एसटी बसवर या जाहिराती झळकतील. त्यासाठी जे काही चार्जेस असतील, ते अदा करण्यात येतील, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना सांगितले.