शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
2
भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
3
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी
4
वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले
5
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
6
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...
7
"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
8
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
9
राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!
10
अखेर Jay Shah यांनी रोहितच्या भवितव्याचा निर्णय घेतला; ४ जणांना वर्ल्ड कप समर्पित केला
11
साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल
12
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य
13
Justin Bieber : जस्टिन बिबरने शेअर केले अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याचे Inside photos
14
"पंथ आणि परिवारातून एकाची निवड करायची झाल्यास मी…’’, अमृतपाल सिंगचं आईला उत्तर 
15
एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...
16
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 
17
IND vs PAK Champions : भारताच्या विजयाची हॅटट्रिक हुकली; पाकिस्तानचा मोठा विजय, दिग्गज मैदानात
18
Hathras Stampede : २४ आश्रम, २५ वाहनांचा ताफा, १०० कोटींची संपत्ती; जाणून घ्या 'भोले बाबां'कडे नेमकं काय आहे?
19
"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं
20
"पहिल्याच नजरेत प्रेम, लग्न, घर, मुलं..."; शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा भावूक करणारा Video

शिवसेना, राष्ट्रवादीतर्फे व्यंकय्या नायडूंचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:34 PM

शिवरायांच्या जयघोषाला विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, उपराष्ट्रपतींना पत्रही पाठविले

धुळे : उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या वागणुकीचा महाविकास आघाडी सरकारचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँगे्रसने तीव्र शब्दात निषेध केला आहे़शिवसेनेतर्फे गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ व्यकंय्या नायडू यांनी शिवाजी महाराजांच्या जयघोषाला विरोध करुन एक प्रकारे त्यांचा अवमान केल्याने भावना दुखावल्या आहेत़ त्यामुळे व्यंकय्या नायडूंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत त्यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे़असा प्रकार भविष्यात खपवून घेतला जाणार नाही. पुन्हा असे वक्तव्य केल्यास भाजप नेत्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, युवा सेनेचे पंकज गोरे, आधार हाके, उपतालुकाप्रमुख सुदर्शन पाटील, देवराम माळी, संदीप सूर्यवंशी, राजेश पटवारी, प्रफुल्ल पाटील ,संदीप चव्हाण, राजेश पाटील, केशव माळी, अमृत पाटील यांनी दिला आहे़राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देखील व्यंकय्या नायडूंच्या वर्तणुकीचा जाहिर निषेध केला आहे़ पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, निलेश चौधरी, राजदिप काकडे, एजाज शेख, रवी कोरे, निखील मोमाया, चंद्रशेखर भदाणे, अरविंद पाटील आदींनी गुरूवारी मुख्य टपाल कार्यालयातून व्यंकय्या नायडू यांना शिवरायांच्या जयघोषाचे पत्र पाठविले़ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली़राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी सांगितले की, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला़ यावेळी सभापती व्यंकय्या नायडून यांनी शिवरायांच्या घोषणेला विरोध केला़ ज्या छत्रपतींच्या नावाने भारतीय जनता पार्टी राजकारण करते, ज्या छत्रपतींमुळे हिंदूत्व व मंदिरे टिकून राहिली, त्या छत्रपतींच्या घोषणेला विरोध का? असा प्रश्न उपस्थित करीत, शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय भाजपचे राजकारण पूर्ण होत नाही़ असे असताना त्यांच्या नावाच्या जयघोषाला विरोध करणाºया भाजपच्या नेत्यांचा जाहिर निषेध करतो, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे़यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तीव्र भावना व्यक्त केल्या़

टॅग्स :Dhuleधुळे