शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

धुळे मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेने दिला लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 2:17 PM

शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांनी दिले पत्र

ठळक मुद्देमहापालिकेची ७४ जागांसाठी निवडणूकदोन दिवसांपूर्वी लोकसंग्राम पक्षाने सेनेच्या पाच उमेदवारांना दिला होता पाठिंबाशिवसेनेही १३ उमेदवारांना पांिंठबा देवून केली परतफेड

आॅनलाइन लोकमतधुळे : आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून दोन दिवस उलटत नाही, तोच शिवसेनेनेही दुप्पट परतफेड करीत, ज्या वॉर्डात शिवसेनेचे उमेदवार नाही त्या ठिकाणी लोकसंग्रामच्या १३ उमेदवारांना सक्रीय पाठींबा देत असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. या पाठींबा सत्रामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा आहे.महानगरपालिकेची ७४ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यात शिवसेनेचे ४८ तर लोकसंग्राम पक्षाचे ५९ उमेदवार  रिंगणात आहेत.महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असतांनाच आमदार अनिल गोटे यांनी  चाणक्यनितीचा अवलंब करीत   ज्या प्रभागात लोकसंग्रामचे उमेदवार नाही, त्याठिकाणी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना जाहिर पाठिंबा देवून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर अनपेक्षितपणे मिळालेल्या पाठिंब्याचे शिवसेनेने स्वागतच केले होते. राजकीय वर्तुळात दोन दिवस या पाठिंब्याची चर्चा सुरू असतांनाच, शिवसेनेनेही दुप्पट परतफेड केली. शहरातील गुंडगिरी नाहीशी करण्यासाठी तसेच मताचे विभाजन टाळण्यासाठी ज्या वॉर्डात शिवसेनेचे उमेदवार नाहीत, त्याठिकाणी लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना  जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने व उत्तर महाराष्टÑाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेने लोकसंग्राम पक्षाच्या ज्या उमेदवारांना पांिठंबा जाहीर केला, त्यामध्ये प्रभाग ४ ब- शेख जकीयाबी शे.जाकीर, ४ क- सुनंदा मोहनगीर गोसावी, ६ क- रंगराव रवींद्र सिसोदे, १३ अ- अन्सारी मोहंमद फसल, १३ क- संगीता कैलास कोळवले, १३ ड - सैय्यद इजाज महंमद इसाक, १५ अ- वैशाली विजयकुमार जवराळ, १५ ब- शितल संदेश भोपे, १५ क- राहूल रमेश वाघ, १५ ड- योगेश दत्तात्रय मुकुंदे, १७ ब- रजनी संदीप येवलेकर, १९ क- सैय्यद रजियासुल्ताना शफियुद्दिन, १९ ड- अन्सारी अकील अहमद सादीक यांचा समावेश आहे. शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक